वैयक्तिक प्रवास कर्ज घ्या आणि मनसोक्त हिंडा

एकूण खर्चाच्या २० टक्के अतिरिक्त कर्ज घेतल्यास अडीनडीला कामी येईल.
personal travel loan
personal travel loangoogle

मुंबई : एकदा तरी परदेशात जावं ही प्रत्येकाची इच्छा असते; मात्र त्यासाठी आर्थिक जुळवाजुळव करण्यासाठी वर्षानुवर्षे वाट पाहावी लागते. वैयक्तिक कर्ज घेऊन मात्र परदेशवारीची इच्छा प्रत्येकाला पूर्ण करता येऊ शकते.

personal travel loan
लग्नासाठी कर्ज घेताना लक्षात ठेवायचे 4 मुख्य मुद्दे

पर्सनल लोन फॉर ट्रॅव्हलसाठी अर्ज करता काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

तुम्ही संपूर्ण प्रवास कर्जाद्वारेच करणार आहात की काही खर्च पूर्वकमाईतून करणार आहात हे आधी ठरवावे लागेल. जाण्याचा प्रवास, विमान, ट्रेन यांची तिकिटे, राहण्याचा खर्च, जेवणाचा खर्च, इत्यादी खर्चाचा विचार करावा. तसेच परदेशी चलनाच्या किंमतीची माहिती करून घ्यावी. एकूण खर्चाच्या २० टक्के अतिरिक्त कर्ज घेतल्यास अडीनडीला कामी येईल.

personal travel loan
पुणेकरांची परदेश वारी ‘खर्चिक’ सिंगापूर, फ्रँकफर्टला थेट विमानसेवा नसल्याने रोज चार हजार जणांना गाठावी लागतात अन्य शहरे

कर्जपात्रता मानदंड

बँक किंवा कर्जदाता तुमची कर्ज फेडण्याची क्षमता बघूनच कर्ज द्यायचे की नाही हे ठरवतात. यासाठी तुमचे मासिक उत्पन्न, रोजगाराची स्थिती, आयुर्मान, इतर देणी, इत्यादी गोष्टींचा विचार केला जातो.

आवश्यक कागदपत्रे

कर्ज मिळवण्यासाठी केवायसी कागदपत्रे, सॅलरी स्लीप किंवा बँक विवरण आणि एक व्यवस्थित भरलेला अर्ज सादर करावा लागतो.

व्याजदर

विविध कर्जदाते कर्जावर विविध प्रमाणात व्याजदर आकारतात. त्यामुळे कर्जदात्यांनी जाहीर केलेले व्याजदर आणि प्राशासनिक शुल्काची माहिती करून घ्या. ही माहिती तुम्हाला इन्स्टन्ट लोन अॅपवर मिळू शकते किंवा कर्जदात्यांच्या संकेतस्थळावरही मिळू शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com