Travel Trivia : तुम्हाला माहितीये, हॉटेलमध्ये पांढऱ्याच बेडशीट का असतात? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Travel Trivia

Travel Trivia : तुम्हाला माहितीये, हॉटेलमध्ये पांढऱ्याच बेडशीट का असतात?

Why White Bedsheet on Hotel Bed : ही गोष्ट तर तुम्हीपण बघितली असेल की, स्वस्त असो वा महागडं, साधं असो वा फाईव्ह स्टार सर्वच हॉटेल्सच्या खोल्यांमध्ये तुम्हाला पांढऱ्या रंगाच्या चादर पाहायला मिळतात. उशा, चादरी, बेडशीट सगळंच पांढऱ्या रंगाच्या असतात.

सर्व हॉटेल्सच्या खोल्यांमध्ये फक्त पांढऱ्या रंगाच्या बेडशीट ठेवल्या जातात हे तुम्ही पाहिलंच असेल. हे बघून तुमच्या मनात कधी हा प्रश्न आला आहे का किंवा तुम्ही कधी विचार केलाय का? हॉटेलमध्ये पांढऱ्या रंगाची चादर का वापरतात दुसऱ्या रंगाची का नाही?

हेही वाचा: Diwali Travel : माहेरवाशीनींची बसस्‍थानकावर गर्दी; खानदेशासाठी सर्वाधिक प्रवासी

या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्या.

  • हॉटेलच्या खोल्यांमध्ये पांढऱ्या चादर अर्थात बेडशीट किंवा उशीचं कव्हर वापरण्यामागचं मुख्य कारण म्हणजे पांढऱ्या चादरी स्वच्छ करणं खूप सोपं आहे.

  • हॉटेल्समध्ये एकाच वेळी सर्व खोल्यांमधील चादरी आणि कव्हर ब्लीच वापरून धुतले जातात, तसंच त्या बेडशीट क्लोरीनमध्येही भिजवल्या जातात.

हेही वाचा: Travel : प्रवासाला जाताना या गोष्टी सोबत ठेवाच; प्रवास होईल सुखाचा

  • अशा वेळी जर या चादरी रंगीत असतील तर त्यांचा रंग लवकरच फिकट होऊ लागतो.

  • त्यामुळे इतर रंगाच्या चादरी दिसायला रंग उडालेल्या दिसतात. पण पांढऱ्या रंगाच्या चादरींच्या बाबतीत ही समस्या नसते.

  • पांढरा रंग सामान्यतः लक्झरी लाईफस्टाईलशी संबंधित आहे.

हेही वाचा: Travelling : फिरायला जा आणि निरोगी राहा

  • अशा परिस्थितीत हॉटेलच्या खोलीतील पांढरी बेडशीट खोलीला लक्झरी लुक देण्याचे काम करते.

  • याशिवाय कमी किमतीत जाड चादरी खरेदी करण्यासाठी पांढरा रंग हा उत्तम पर्याय आहे.

टॅग्स :Travellifestyle