विदेशात पासपोर्ट हरवला घाबरू नका; प्रथम करा 'ही' गोष्ट

पासपोर्ट हरवल्यानंतर आपल्या देशात परत कसं जायचं?
passport lost
passport lostsakal

विदेशात फिरायला जाण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. मात्र, या प्रवासादरम्यान आपल्या जवळील प्रत्येक गोष्ट सांभाळून ठेवण्याची जबाबदारी ही आपली असते. अनेकदा विदेशात गेल्यावर काहींचं पाकिट, पासपोर्ट हरवतो किंवा चोरीला जातो. दुसऱ्या देशात असा प्रसंग घडल्यानंतर अनेक जण घाबरुन जातात. आपल्याला आपल्या देशात पुन्हा कधीच जाता येणार नाही अशी भीती अनेकांना वाटते. मात्र, या परिस्थितीत घाबरुन न जाता धैर्याने काम करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणूनच, विदेशात तुमचा पासपोर्ट हरवला तर काय करावं ते जाणून घेऊयात. (travel what to do after lost passport abroad)

१. पोलिस स्टेशन गाठा-

विदेशात जर तुमचा पासपोर्ट किंवा पाकिट चोरीला गेलं तर सगळ्यात आधी तेथील जवळच पोलिस स्टेशन गाठा. आणि, रितसर तक्रार नोंदवा. त्यानंतर आपल्या देशात दुतावासमध्ये याविषयी माहिती द्या. तसंच एक गोष्ट लक्षात ठेवा. हरवलेला पासपोर्ट परत मिळाला. तरीदेखील मूळ पासपोर्ट रद्द केला जातो.

२. आपल्या देशात परत कसं यायचं?

पासपोर्ट हरवल्यानंतर साधारणपणे तुमच्या देशात जाणारी फ्लाईट कधी किंवा किती वाजता आहे याचा आढावा घ्या. त्यानुसार, तुम्हाला तात्पुरता किंवा कायमस्वरुपात पासपोर्ट मिळू शकतो. तसंच जर तुमच्या फ्लाइटला थोडाच वेळ बाकी असेल तर दुतावासातून इमरजन्सी सर्टिफिकेट मिळतं त्या आधारे तुम्ही प्रवास करु शकता.

विदेशात भारतीय दुतावास किंवा पासपोर्ट ऑफिसची माहिती कशी मिळवाल?

विदेशात जाताना इमरजन्सी कॉन्टॅक्ट लिस्ट कायम जवळ बाळगा. यात तुमच्या हॉटेलचा फोन नंबर, जवळच्या पोलिस स्टेशनचा नंबर, आपल्या देशाच्या दुतावासाचा फोन नंबर व पत्ता यांचा समावेश असावा. तसंच जगातील भारतीय पासपोर्ट मिशन्सची अधिक माहिती मिळवण्यासाठी www.passportindia.gov.in वर लॉग इन करुन ठेवा.

विदेशात प्रवास करताना घ्या 'ही' काळजी

१. कधीही पासपोर्टच्या दोन झेरॉक्स काढून ठेवाव्यात. तसंच या झेरॉक्स एकाच ठिकाणी न ठेवता वेगवेगळ्या ठिकाणी ठेवाव्यात. (पासपोर्ट हरवल्यानंतर झेरॉक्स ग्राह्य धरले जात नाहीत.मात्र, काही वेळा याची मदत नक्कीच होऊ शकते.)

२. आयडी प्रुफ म्हणून जवळ जन्माचा दाखला ठेवावा.

३.कायम ट्रॅव्हल इंश्युरन्स काढूनच प्रवास करावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com