Parenting Tips
Parenting Tipsesakal

Parenting Tips : लहान मुलांसोबत फ्लाईटने प्रवास करताना पालकांनी ‘या’ गोष्टींची घ्यावी काळजी

लहान मुलांसोबत विमानाने प्रवास करताना पालकांना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते.

Parenting Tips : लहान मुलांसोबत प्रवास करणे हे अजिबात सोपे नाही. पालकांना लहान मुलांसोबत प्रवास करताना अनेक गोष्टींची खास काळजी घ्यावी लागते. त्यातल्या त्यात ट्रेन आणि फ्लाईटने मुलांसोबत प्रवास करणे हे जरा कठीण काम आहे.

फ्लाईटमधील मर्यादित जागा, अनोळखी चेहरे, लोकांची गर्दी आणि जास्त वेळ एकाच ठिकाणी बसावे लागत असल्यामुळे लहान मुलांना कंटाळा येतो. त्यांना अस्वस्थ देखील वाटू शकते. मात्र, पालकांनी जर थोडी तयारी केली आणि सावधगिरी बाळगली तर तुम्ही लहान मुलांसोबत प्रवासाचा आनंद ही घेऊ शकता.

आज आपण लहान मुलांसोबत फ्लाईटमध्ये प्रवास करताना पालकांनी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी? त्याबद्दल जाणून घेणार आहोत.

Parenting Tips
Parenting Tips : मानसिकदृष्ट्या मजबूत राहण्यासाठी मुलांना जरूर शिकवा ‘या’ गोष्टी

मुलांचे आवश्यक सामान सोबत घ्या

विमानाने प्रवास करताना लहान मुलांसाठीचे आवश्यक सामान सोबत ठेवायला विसरू नका. यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश होतो, जसे की, डायपर, औषधे, लहान मुलांचा खाऊ इत्यादी गोष्टी पुरेशा प्रमाणात असल्याची खात्री अवश्य करा. त्यासाठी पालकांनी प्रवासाला जाण्यापूर्वीच या गोष्टींची तजवीज करून ठेवावी. (Carry children's essentials)

या गोष्टी सोबत ठेवल्याने तुम्ही मुलांच्या गरजा वेळेत पूर्ण करू शकाल आणि प्रवासाचा आनंद ही आरामात घेऊ शकाल.

कानांचा करा बचाव

विमान प्रवास करताना लहान मुलांचा कान दुखणे हे खरं तर सामान्य आहे. कारण, विमानाने उड्डाण घेण्यापूर्वी आणि विमान लॅंड होताना विमानाचा प्रचंड आवाज येतो. या आवाजाचा लहान मुलांना अतिशय त्रास होतो. त्यांचे कान दुखतात. (Protect the ears)

या वेदनांचा त्रास थांबवण्यासाठी तुम्ही फ्लाईटमध्ये चढण्यापूर्वी च्विंगम किंवा कॅंडी मुलांना खायला द्यावी. जेणेकरून मुलांचे कान उघडे राहतील. जर मुलांना याचा अधिक त्रास होत असेल तर, कानाच ड्रॉप किंवा लहान मुलांची औषधे सोबत ठेवावीत.

खेळणी सोबत ठेवा

फ्लाईटमध्ये प्रवास करणे आणि बराच वेळ एकाच जागी बसण्याची सक्ती असल्यामुळे मुलांना हा प्रवास कंटाळवाणा वाटू शकतो. त्यामुळे, लहान मुलांचे मनोरंजन करण्यासाठी पालकांनी त्यांच्या आवडीची पुस्तके आणि खेळणी सोबत ठेवावीत. जेणेकरून त्यांचा वेळ ही जाईल आणि प्रवास ही सूखकर होईल. (Carry toys)

Parenting Tips
Parenting Tips : वारंवार समजावून देखील मुले वाद घालतात?मग, 'या' ट्रिक्सचा वापर करून मुलांना लावा वळण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com