युवती आणि स्त्रियांना लागले स्टेटस ठेवण्याचा ट्रेंड

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 21 May 2020

सोशल मीडियाने देशभरात सर्वांनाच वेड लावले आहे. सध्या सर्वांच्या हातात अँड्रॉइड फोन उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रत्येकजण सोशल मीडियावर कनेक्ट असतो. त्यात सध्या लॉकडाऊनमुळे सर्वजण घरातच बसून आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर सुरुवातीला चॅलेंज एक्सपेक्टेड 'ट्रॅडिशनल लूक' त्यानंतर 'अब मुस्कुराये गा इंडिया' तर आता सध्या 'नखरा नथीचा' हे चॅलेंज एक्सेप्ट करून व्हाट्सअॅप स्टेटसवर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. काही दिवसांपासून सोशल मीडियावर हा वाढता ट्रेंड पहावयास मिळत आहे.

आजकाल सोशल मीडियावर प्रत्येकजण नेहमीच ॲक्टिव असतो. कारण प्रत्येकाच्या हातामध्ये स्मार्टफोन आहे. रोज नव्याने येणारे नवनवीन चॅलेंज एक्सेप्ट करताना आपल्याला नेहमीच पाहावयास मिळतात. त्याच पद्धतीने तरुणी आणि महिलाही सोशल मीडियावर सुरू असलेले चॅलेंज एक्सेप्ट करत आहेत. स्वतः चॅलेंज एक्सेप्ट करून आपल्या फ्रेंड सर्कलासुध्दा ते चॅलेंज एक्सेप्ट करण्यासाठी सांगत आहे.  फॅशनच्या दुनियेत नव्याने रोज कोणती ना कोणती फॅशन पहावयास मिळतेच. त्यात साडी आजकाल प्रत्येक स्त्रियांना नेहमीच आवडते आणि साडीमध्ये स्त्रिया अधिकाधिक सुंदर दिसतात. कोणत्याही समारंभासाठी साडीला पहिली पसंती दिली जाते. ओ साडी टिपीकल असे म्हणणाऱ्या मुलीची साडीतील साजशृंगार केलेला त्यात चेह-यावरील स्माईल आणि नाकात घातलेली नथ असा सुंदर फोटो सध्या व्हाट्सअप स्टेटस वर अपलोड करत आहेत. सध्या सोशल मीडियावर ट्रॅडिशनल लूक, अब मुस्कुरायेगा  इंडिया आणि  नखरा नथीचा या पध्दतीने काढलेले फोटो सिलेक्ट करुन स्टेटस ठेवण्याचा ट्रेंड सुरु झाला आहे. त्यामुळे अनेक युवती आणि महिला वेगवेगळ्या पद्धतीने काढलेले फोटो सध्या सोशल मीडियावर स्टेटस द्वारे ठेवून शेअर करत आहेत. प्रत्येकाचा फॅशन फंडा प्रत्येकाची स्वतःची स्टाइल असते. त्याच पद्धतीने मराठमोळा लुक त्यावर घातलेला शृंगार त्यात महत्त्वाची असलेली आणि खुदकन हसलेली ती स्माईल असा काढलेला फोटो सुंदरच दिसतो नवीन फॅशन विश्वासातही हा लुक पारंपरिकरीत्या सगळ्यांना आकर्षण करत असतं. त्यामुळे युवती आणि महिला चॅलेंज एक्सेप्ट करू व्हाट्सअॅप स्टेटस ठेवण्याकडे जास्त भर देत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Trend of keeping status has started for young women and girls