ट्रेंड्सच्या मागे उगीचच धावू नका

मला साडी अतिशय आवडते.
मला साडी अतिशय आवडते.
मला साडी अतिशय आवडते.sakal

मला साडी अतिशय आवडते. मला वाटतं साडीमध्ये कुठलीही स्त्री सुंदरच दिसते. साडी हा प्रकार अतिशय दिमाखदार आहे. मला साड्या आवडतात आणि माझ्याकडे साड्याचे पुष्कळ कलेक्शन आहे.

फॅशन करताना, पोशाख घालताना, साडी नेसताना काळजी घ्यायला हवी. ट्रेंडिंग काय आहे ते करताना आपल्या सुविधेकडे दुर्लक्ष करू नये. आपण अनेक लोकांना पाहतो जे त्यांनी घातलेल्या कपड्यांमध्ये कम्फर्टेबल नसतात आणि त्यांच्या देहबोलीमधून ते दिसून येते. त्यामुळे मला वाटतं स्टाईल, ट्रेंड किंवा फॅशन यांच्या फारसे मागे न लागता आपण ज्या कपड्यांमध्ये कम्फर्टेबल असतो तेच घालावेत. ती आपोआपच आपली फॅशन बनते.

माझा फॅशन फंडा अगदी सोपा... ‘बी युअर सेल्फ!’ मी ट्रेंड्‌सच्या मागे धावत नाही. माझ्या शरीराला काय शोभून दिसतं त्याकडे मी लक्ष देते. माझ्यासाठी जे कपडे कम्फर्टेबल आहेत तेच मी घालते आणि तोच माझा फॅशन फंडा आहे. सध्या मी झी टीव्हीवरील ‘मैं हूँ अपराजिता’मध्ये मोहिनीची भूमिका साकारत आहे. त्यामुळे मला कपड्यांच्या रंगाची व फॅशन करताना खूप काळजी घ्यावी लागते.

मला वाटतं, प्रत्येकच रंग सर्वांवर चांगला दिसतो. मी माझ्या त्वचेच्या रंगानुसार वगैरे माझ्या कपड्यांच्या रंगांची निवड करत नाही. मी हे करताना अनेकांना पाहिले आहे; पण मी ते करत नाही. रंगांची मजा सर्वांनीच घ्यायला हवी, केवळ कपड्यांच्या बाबतीत नाही तर मेकअपच्या बाबतीतही. आपण आपल्या आयलायनर आणि आय शॅडोसाठी कपड्यांच्या रंगांनुसार विविध रंगांचा वापर करू शकतो. तो मिलाफ अचूक ठरतो. त्यामुळे मला प्रत्येकच रंग आवडतो.कम्फर्ट, कम्फर्ट, कम्फर्ट. माझ्यासाठी हीच एक महत्त्वाची गोष्ट आहे.

मला खूप अंगप्रदर्शन करणारे कपडे आवडत नाहीत; पण जर कोणी असे कपडे घालताना कम्फर्टेबल असतील तर त्यांनी ते घालावेत.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही योग्य फूटवेअरची निवड करणे, कारण जर ते तुमच्या पायांना साजेसे नसतील, तर दिवसअखेरीस तुमचे पाय दुखू शकतात.

प्रत्येक रंगाचे कपडे घालावेत.

आपल्या शरीराला काय शोभून दिसते, त्याकडे लक्ष देणे.

स्वतःसाठी कम्फर्टेबल असे कपडे घालणारे आणि ते आत्मविश्वासाने कॅरी करणारे सगळेच माझ्यासाठी फॅशन आयकॉन्स आहेत. मी फॅशन स्टाईल स्टेटमेंट्‌सच्या मागे धावत नाही. मला लोकांच्या कपड्यांची पसंत आवडते.

(शब्दांकन : अरुण सुर्वे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com