हेल्मेट न घातल्यामुळे ट्रक चालकावर कारवाई; परिवहन विभागाचा भोंगळ कारभार

truck driver did not wear a helmet police cut challan of thousand rupees people gave such reactions
truck driver did not wear a helmet police cut challan of thousand rupees people gave such reactions
Updated on

गेल्या काही काळात वाहतुकीचे नियम चांगलेच कठोर करण्यात आले आहेत. त्यामुळे आता वाहन चालवतांना हेल्मेट घालणं सक्तीचं झालं आहे. त्यातूनही जर एखादी व्यक्ती हेल्मेटविना आढळून आली तर त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येते. त्यामुळे दुचाकी चालवताना हेल्मेट वापरणं गरजेचं आहे. परंतु, चारचाकी किंवा ट्रक चालवतांना तुम्ही कधी हेल्मेट वापरलं आहे का?, अर्थात याचं उत्तर नाही असंच असेल. कोणतेही चारचाकी किंवा अवजड वाहन चालवत असताना सीटबेल्ट बांधणं गरजेचं असतं. मात्र, ओडिशामध्ये एक अजब प्रकार घडला आहे. एका ट्रक ड्रायव्हरने हेल्मेट न घालता ट्रक चालवल्यामुळे त्याच्याकडून दंड आकारण्यात आला आहे.  या प्रकरणाची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली असून ओडिसामधील परिवहन विभागाचा भोंगळ कारभार समोर आला आहे.  ओडिशामधील गंजम जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे.

ओडिशामधील गंजम येथील प्रमोद कुमार यांनी ट्रक चालवतांना हेल्मेट न घातल्यामुळे त्यांच्याकडून दंड आकारण्यात आला आहे.  विशेष म्हणजे परिवहन विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलेलं कारण ऐकून प्रमोद कुमारदेखील थक्क झाल्याचं त्यांनी सांगितलं

अलिकडेच प्रमोद कुमार वाहन परमिट नूतनीकरणासाठी परिवहन विभागाच्या कार्यालयात गेले होते. यावेळी तुझ्या गाडी क्रमांक OR-07W/4593 च्या नावाने एक चलान भरायचे बाकी असल्याचं त्यांना सांगण्यात आलं. यावर हे चलान नेमकं कोणत्या कारणासाठी अशी विचारणा प्रमोद कुमार यांनी केली. त्यावर ट्रक चालवतांना हेल्मेट न घातल्यामुळे हा दंड आकारण्यात येत असल्याचं त्यांना सांगण्यात आलं. विशेष म्हणजे प्रमोद कुमार यांनी याविषयी परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारदेखील केली. मात्र,तरीदेखील त्यांच्याकडून हा दंड आकारण्यात आला.

दरम्यान, प्रमोद कुमार यांची कोणतीही बाजू ऐकून न घेता त्यांच्याकडून एक हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. त्यामुळे सध्या या घटनेची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. तसंच ओडिशामध्ये परिवहन विभागात सुरु असलेला भोंगळ कारभारदेखील समोर आला आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com