esakal | सुंदर त्वचेसाठी ट्राय करा चारकोल फेसपॅक! फायदे वाचून व्हाल थक्क

बोलून बातमी शोधा

charchol mask
सुंदर त्वचेसाठी ट्राय करा चारकोल फेसपॅक! फायदे वाचून व्हाल थक्क
sakal_logo
By
टीम-ईसकाळ

चारकोल हा जरी रंगाने काळा आहे. मात्र, तो चेहऱ्याची सुंदरता वाढवण्यासाठी खूप उपयोगी पडतो. चारकोल आपल्या त्वचेसाठी खूप मदतीचा ठरु शकतो. त्यासाठी तुम्हाला अ‌ॅक्टिव्हेटेड चारकोल वापरावा लागेल. हा चारकोल तुम्हाला बाजारात सहज उपलब्ध होईल. बाजारात फेसमास्क आणि फेसवॉशच्या स्वरुपातसुद्धा अ‌ॅक्टिव्हेटेड चारकोल मिळतो. चला तर मग जाणून घेऊयात चारकोलचे फायदे.

चारकोल फेसपॅक

हा फेसपॅक तयार करण्यासाठी बाजारात चारकोलच्या गोळ्या सहज अपलब्ध होतात. या गोळ्यांना चागंल्या प्रकारे बारीक करुन घ्या. त्यानंतर व्हिटॅमिन ई ची गोळी घेऊन ती या चारकोलमध्ये मिसळावी. गरज असल्यास त्यात थोडे पाणी मिसळावे. त्यानंतर हे मिश्रण चेहऱ्यावर मास्क लावल्याप्रमाणे लावावे. हे मिश्रण चेहऱ्यावर कोरडे झाल्यानंतर हलक्या हातांनी काढून घ्यावे.तीन अ‌ॅक्टिव्हेटेड चारकोलच्या गोळ्या, मुलतानी माती, व्हिटॅमिन-ई चे तेल आणि मध पाण्यात मिसळून चेहऱ्यावर लावावे. 10 मिनिटांनतर चेहरा धुतल्याने चेहरा तजेलेदार होतो.

चारकोल फेसपॅकचे फायदे

तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स किंवा ब्लॅकहेड्स असतील तर चारकोलच्या मदतीने या समस्येपासून सुटका मिळू शकते. त्यासाठी चारकोलचा फेसपॅक किंवा फेसवॉश किंवा दोन्हींचा वापर केला जाऊ शकतो.चारकोल फेसवॉश किंवा फेसपॅकच्या नियमित वापराने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. चारकोलमुळे चेहरा तरतरीत राहण्यास मदत होते.चेहऱ्याची चांगल्या प्रकारे स्वच्छता होते. नियमित वापर केल्यांनतर चेहऱ्यामध्ये फरक दिसू लागेल. तो नरम, आणि टवटवीत दिसेल.तुमचा चेहरा जर तेलकट होत असेल तर तुम्ही चारकोलचा वापर करु शकता. चेहऱ्यावर येत असलेल्या सीबमला चोरकोल रोखून धरतो. आणि चेहरा तेलकट होत नाही.

(डिसक्लेमर: वरील लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीच्या आधारावर आहे. याबाबत अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा)