
बाल्कनी ही घरातील एक छोटीशी विश्रांतीची जागा असते. चहाचे घेट तिथे तुम्ही आरामात बसू शकता, पुस्तकं वाचू शकता किंवा निसर्गाचा आनंद घेऊ शकता. पण बाल्कनीत फक्त झाडांच्या कुंड्या ठेवून ती उत्तम दिसत नाही. इतर अनेक गोष्टी करून तिला आपली ‘कम्फर्ट स्पेस’ बनवता येईल. बाल्कनीचं एक वैशिष्ट्य म्हणजे तिचं रूप आपल्याला सतत बदलता येतं आणि त्यात वेगवेगळे प्रयोग करता येतात. अगदी साध्या आणि स्वस्त पद्धतीनं बाल्कनीला सुंदर आणि आरामदायी कसं बनवायचं यासाठीच्या काही टिप्स बघूया-
बाल्कनीमध्ये हिरवाई हवीच. झाडांच्या कुंड्या ठेवण्यापासून लॉनसारखा अनुभव मिळण्यासाठी ‘ग्रीन मॅट्स’चा वापर करणं, अशा अनेक गोष्टी तुम्ही करू शकता.
छोट्या कुंड्या : तुळस, पुदिना, गुलाब, जास्वंद, वेगवेगळी ‘ऑफिस प्लॅंट्स’ अशी छोटी झाडं असलेल्या कुंड्या तुम्ही बाल्कनीत ठेवू शकता.
हँगिंग कुंड्या : भिंतीवर किंवा कुंपणावर फुलझाडांच्या कुंड्या अडकवता येतात. अशा हँगिंग कुंड्यांमुळे बाल्कनीला छान ‘लूक’ मिळतो.
व्हर्टिकल गार्डन : जागा कमी असल्यास भिंतीवर किंवा खास स्टँड तयार करून त्यात विशिष्ट पद्धतीनं झाडं लावून झाडांची उभी भिंत तयार करता येते. यात कल्पकपणे मांडणी करता येते.