

Types of Smiles: Science Behind the 19 Grins and True Meanings
esakal
Meanings Behind Smiles: 'हास्य' किंवा 'स्माईल' (Smile) ही मानवाला लाभलेली एक सुंदर देणगी मानली जाते. सहसा हसणाऱ्या व्यक्तीला आपण आनंदी, आदरणीय, आत्मीय आणि मैत्रीपूर्ण मानतो. पण, आपण मानत असलेला हा विचार पूर्णपणे सत्य नाही. वैज्ञानिक आणि मानसशास्त्रीय संशोधनातून एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे, ते म्हणजे मानवी चेहऱ्यावर फुलणाऱ्या १९ प्रकारच्या हास्यांपैकी फक्त ६ प्रकारची हास्ये ही खऱ्याखुऱ्या आनंदाशी संबंधित असतात. उरलेली १३ प्रकारची हास्ये ही वेदना, भीती, तिरस्कार, मानहानी किंवा नैराश्य लपवण्यासाठी वापरली जातात.
याविषयी शास्त्रज्ञांनी केलेले विविध प्रयोग आणि ऐतिहासिक संशोधनातून हास्याशी संबंधित अनेक रंजक व थक्क करणाऱ्या बाबी उघडकीस आल्या आहेत.