पालक होण्याची भूमिका सोपी नाही; करावी लागते तारेवरती कसरत

मुलांना समजून घ्या
मुलांना समजून घ्यामुलांना समजून घ्या

नागपूर : सध्याची जीवनपद्धती आणि वाढती स्पर्धात्मकता मुलांचे बालपण हिरावून घेणारी आहे. प्रत्येक परीक्षेत अधिकाधिक गुण मिळवण्याचा ताण लहान असल्यापासूनच त्यांच्यावर टाकला जातो. अपयशातूनच मुलं शिकू शकतात, हा विचार अनेकांच्या पचनी पडत नाही. मात्र, मुलांच्या अंगी अपयश पचवण्याची क्षमताही असायला हवी. अपयश आल्यानंतर मुलांना आपण मेहनतीत कमी पडल्याची जाणीव होते.

पालक होण्याची भूमिका सोपी आहे असे कोणीच सांगणार नाही. पालक होण्याचा जितका आनंद असतो तितकीच मोठी जबाबदारी असते. अपत्याची चांगल्या पद्धतीने पोषण, संस्कार, त्याच्या सवयी या तितक्याच संवेदनशील बाबी आहेत. संसाराला लागणारा पैसा व कुटुंबाच्या सर्व गरजा पुरवून घराला आनंदी ठेवणे, या दोन्ही जबाबदाऱ्या तारेवरच्या कसरती असतात.

मुलांना समजून घ्या
आईच्या मृत्यूला न आलेला मुलगा दशक्रियेला आला अन् गमावला जीव

आपल्या मुलाची कोणाशीही तुलना करू नका. यामुळे मुलं स्वत:ला कमी समजू लागतात. त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होतो. आज आपापल्या क्षेत्रात सर्वोच्च स्थानी असणाऱ्या अनेकांना कधी ना कधी अपयशाला सामोरे जावे लागले आहे हे लक्षात ठेवा आणि मुलांना प्रोत्साहन देत राहा. मुलं तणावाखाली असल्याचे जाणवले तर विचारपूस करा. मुलांशी मनमोकळेपणाने बोला.

लहान मुलांचे मानसिक आरोग्य व विकास हा त्यांच्या सर्वांगीण प्रगतीचा महत्त्वाचा पैलू आहे. त्यांच्या मानसिक आरोग्याच्या जडण-घडणीत शिक्षक व पालकांची भूमीका महत्त्वाची ठरते. त्यामुळे बालमानसशास्त्रात पारंगत असलेल्या मानसोपचार तज्ज्ञांनीच या विषयावर शिक्षकांशी संवाद केल्यास बालमानस विकासावर एकत्रितपणे प्रकाश टाकता येईल.

मुलांना समजून घ्या
चौथ्या बाळाचा जन्म; मात्र, रुग्णवाहिकेत बाळासह मातेचा मृत्यू

मनस्थिती समजून घ्या

मुलाविषयी निर्णय घेण्याअगोदर त्याची मनस्थिती काय आहे, हे समजून घ्या. वडील म्हणून ती गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे. प्रत्येक मुलं स्वभावाने वेगळे असते. त्यांचे विचार वेगळे असतात म्हणूनच त्या-त्या प्रसंगात त्याची प्रतिक्रिया भिन्न असते.

रागावून बोलू नका

ज्या गोष्टी मुलाला त्रासदायक वाटतात त्या तुम्हाला महत्त्वाच्या वाटत असतील तेव्हा त्यावेळी त्याच्या भावनांची कदर करा. त्याची समज कमी असल्याने प्रेमाने समजावून सांगा. त्यावर रागावून बोलू नका.

तुलना नको

मुलाची सतत इतर मुलांबरोबर तुलना करू नका. त्यामुळे त्याचा मनात न्यूनगंड निर्माण होईल. कदाचित तो तुमचा आणि त्या मुलाचा दुस्वास करू लागेल.

मत जाणून घ्या

मुलाला दररोजच्या दैनंदिन गोष्टीमध्ये सहभागी करून घ्या. निर्णय घेण्याअगोदर त्याला सांगा त्याचे मत जाणून घ्या.

दृष्टीकोन

तुमच्या मुलाची वाढ एका टप्यातून दुसऱ्या टप्यात होत असताना त्याच्या दृष्टीने जग व जीवन बदलत असत. त्यामुळे त्याचा दृष्टिकोनातून प्रत्येक गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com