

Rose Is Optional, Fish Is Mandatory: How the River Tern Wins Its Mate in Nature
sakal
व्हॅलेंटाईन डे निमित्त जसं प्रेम व्यक्त करायची मानवी विश्वातली पद्धत असते तशाच पशुपक्ष्यांतही काही रीतभातच असतात बरं! तसं कुणाच्या प्रेम प्रकरणात लक्ष घालू नये म्हणतात. पण काय करणार? निसर्ग अभ्यासकांना पशुपक्ष्यांच्या या खासगी आयुष्याचेही निरीक्षण करावं लागतं. त्यामुळे नदी सुरयसारख्या अनोख्या पक्ष्यांच्या गमती कळतात. नर नदी सुरय हा मादीला पटवण्यासाठी गुलाब वगैरे देत नाही बरं का... तो चक्क मासा देऊन त्याच्या व्हॅलेंटाईनला पटवतो.