
Women Freedom Fighters of India: १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. यंदा भारत आपला ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. ब्रिटीशांच्या जाळ्यातून भारताला बाहेर काढण्यासाठी अनेक स्वातंत्र्यविरांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. आणि आजही पाकिस्तानसारख्या देशातील लोक आपल्यावर सत्ता गाजवण्याचे स्वप्न पाहतात. तेव्हा अनेक सैनिकांना वीरगती प्राप्त होते.
भारताचा स्वातंत्र्यसंग्राम जितका भगतसिंग, सुभाषचंद्र बोस या शहीदांच्या रक्ताने माखलेला आहे. त्याच पद्धतीने भारतातील काही महिलांचे मळवटही ब्रिटीशांच्या रक्ताने भरलेले होते. कारण, भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात जितका वाटा पुरूषांचा होता तितकाच तो महिलांचाही होता.