esakal | ड्रेसिंग करताना वापरा परफेक्ट फुटवेअर
sakal

बोलून बातमी शोधा

ड्रेसिंग करताना  वापरा परफेक्ट फुटवेअर

ड्रेसिंग करताना वापरा परफेक्ट फुटवेअर

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

पुणे :ड्रेसिंग करताना परफेक्ट फुटवेअरची ही गरज असते. पण फुटवेअर तुमच्या शरीराला मॅच होणारे असले पाहिजेत. महिला बऱ्याचदा योग्य फूटवेअर निवडण्यात कनफ्यूज दिसतात. चला तर जाणून घेऊया कोणत्या ड्रेसवर कोणते फूटवेअर मॅच होतात .

-

पीप टोज-

याला बऱ्याच वेस्टर्न ड्रेसवर मॅच केले जाऊ शकते. जसे की, पेन्सिल स्कर्ट्स, सिगरेट पॅन्ट्स या फॉरमल ड्रेसवर. तसेच हे फुटवेअर इथनिक गाउनसोबतही घातले जाऊ शकतात.

स्टिलेटोज-

हे हाय पॉइंटेड हील्स मोठे क्लासी दिसतात. यांची विषेशतः म्हणजे हे फॉर्मल, कॅज्यूअल पार्टी विअरसोबत घातले जाऊ शकतात.

किटेन हील्स-

हील्स सोबत तुमचं लव-हेटचं नातं असेल तर तुमच्या पेहरावातील स्टाईल वाढवण्यासाठी तुम्ही या हील्सचा वापर करू शकता. हे हील्स नी-लेंथ स्कर्ट, फॉर्मल ट्राउजर्स आणि एथनिक वेअरसोबत घातले जाऊ शकतात.

बॅलरीना-

या हील्सला ब्लेसिंग इन डिसगाइस असंही म्हटलं जातं. कोणत्याही फॉर्मल किंवा कॅज्यूअल ड्रेसवर हे बॅलरीना शोभून दिसतात. याच्या कॉम्बीनेशनमुळे तुम्हाला एकदम परफेक्ट लुक मिळून जाईल.

Edited By- Archana Banage

loading image
go to top