Valentine Day History: सिंगल लोकांच्या जखमांवर मीठ चोळणाऱ्या 'व्हॅलेंटाईन'चा असा आहे इतिहास

व्हॅलेंटाईन डे कधीपासून सुरू झाला याची माहिती आपल्याला आहे का? चला तर जाणून घेऊया व्हॅलेंटाईन डे चा इतिहास.
Valentine Day 2023 history
Valentine Day 2023 historySakal

Valentine Day History: व्हॅलेंटाईन आला की अनेक दिलजलेंना त्यांचा पहिला प्यार आठवायला लागतो. आपल्या प्रिय व्यक्तीला काय गिफ्ट द्यावं याचं विचारात प्रत्येकजण असतो. काही पहिल्या प्रेमाच्या आठवणीत रमतात. आज ती सोबत असती तर... असे अनेक विचार त्यांच्या मनात घोळू लागतात.

अगदी तिचे किंवा त्याचे लग्न झाले असले तरी व्हॅलेन्टाईन म्हटल्यावर तिची किंवा त्याची आठवण येतेच... पण हा व्हॅलेंटाईन डे कधीपासून सुरू झाला याची माहिती आपल्याला आहे का? चला तर जाणून घेऊया व्हॅलेंटाईन डे चा इतिहास.

साधारण तिसऱ्या शतकातली हो गोष्ट. रोम साम्राज्यात एक राजा राहायचा. या राजाला प्रेम या गोष्टीविषयी चांगलाच तिटकारा होता. प्रेम, लग्न या गोष्टीला तो जोरदार विरोध करायचा.

प्रेम आणि लग्नामुळे सैनिकांचे लक्ष विचलित होते अशी त्याची समजूत होती. त्यामुळे सैनिकांनी प्रेम आणि लग्नच करू नये असा फतवाच त्याने काढला होता.

हेही वाचा - अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

या राजाच्या साम्राज्यात एक दयाळू व्यक्ती राहत असायचा. त्याचे नाव होते सेंट व्हॅलेंटाईन. तो त्या राज्यातील एकमेव असा व्यक्ती होता ज्याने राजाच्या या निर्णयाचा विरोध केला. त्याचा विरोध पाहता अनेक लोकांनी या व्हॅलेंटाईनला पाठिंबा दिला.

मग त्याने 'सैनिकांनी बिनधास्त प्रेम करा' असं सांगितलं. राजाला माहित न होऊ देता त्याने काही सैनिकांचे प्रेमविवाह लावून दिले होते. तो एकटा राजाच्या विरोधात जाऊन लग्न लावून देत असल्याने त्याच्याकडे काहीतरी दिव्य शक्ती आहे असा समज लोकांचा झाला होता. त्यानंतर लोकं त्याला संत व्हॅलेंटाईन म्हणू लागले.

दरम्यान, काही काळानंतर राजाला ही रोष्ट समजली आणि राजाने व्हॅलेंटाईनला तुरूंगात टाकले. राजाने त्याला मृत्यूदंडाची शिक्षा दिली. तो तरूंगात असताना त्याला राजाच्या मुलीवर प्रेम झाले.

राजाची मुलगी आंधळी असल्याने व्हॅलेंटाईनने त्याचे डोळे राजाच्या मुलीला दान केले. हे प्रेम बहरत होते. जसंजसं हे प्रेम बहरत होतं तसतसं त्याची शिक्षा जवळ येत होती.

Valentine Day 2023 history
Dhananjay Munde : "मला कोरोना झाला अन् ड्रायव्हर म्हणाला, गाडीची चावी तिथे ठेवलीये"

एके दिवशी व्हॅलेंटाईने जेलरकडे पेन आणि कागद मागितला. त्याने जेलमधून त्याच्या प्रेयसीला प्रेमपत्र लिहिलं आणि पत्राचा शेवट 'तुझाच व्हॅलेंटाईन' असा केला.

त्यानंतर पुढे १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईनला मृत्यूदंडाची शिक्षा झाली. तेव्हापासून हा दिवस व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो असं म्हणतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com