Valentine Day : पार्टनरला चुकूनही देऊ नका या' भेटवस्तू, नाहीतर होऊ शकतो ब्रेकअप, शास्त्र सांगते... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Valentine Day

Valentine Day : पार्टनरला चुकूनही देऊ नका या' भेटवस्तू, नाहीतर होऊ शकतो ब्रेकअप, शास्त्र सांगते...

Valentine Day : सध्या वॅलेंटाईन वीक जोरदार सुरू आहे. त्यामुळे सगळीकडे प्रेमाची चाहूल आहे. अनेकजण पार्टनरसोबत वॅलेंटाईन वीक साजरा करत आहे तर काहीजण वॅलेंटाईनला पार्टनरला काय गीफ्ट द्यावं, याचा विचार करताहेत.

तुम्ही पार्टनरला त्याच्या आवडीचं कोणतंही गीफ्ट देऊ शकता पण शास्त्रानुसार तुम्ही काही वस्तू पार्टनरला कधीच भेट म्हणून देऊ नये. शास्त्रानुसार जर तुम्ही काही वस्तू पार्टनरला दिल्या तर तुम्ही पार्टनरपासून दूर जाऊ शकता. त्या वस्तू कोणत्या? आज आपण या विषयीच जाणून घेणार आहोत. (Valentine Week : Valentine day never give gift these things to your partner read story )

  • अनेक लोकांना काळा रंग आवडतो पण जर तुम्ही त्यांना काळा ड्रेस किंवा वस्तू गिफ्ट करण्याचा विचार करत असाल तर आताच थांबा. कारण शास्त्रानुसार काळा रंग हा अशुभ रंग मानला जातो आणि या रंगाचे तुम्ही त्यांना कोणत्याही वस्तू दिल्या तर तुमच्या नात्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

  • अनेकजण पार्टनरला रुमाल गीफ्ट करतात. पण शास्त्राच्या मते तुमच्या जोडीदाराला रुमाल देणे अशुभ मानले जाते. त्यामुळे व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी रुमाल कधीही गीफ्ट करू नका.

  • अनेकजण पार्टनरला पेन देतात. कारण पेन हा रोजच्या उपयोगाची गोष्ट आहे पण पेन घेतल्याने तुमच्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

  • कधीही पार्टनरला शूज किंवा चप्पल देण्याचा विचार करू नका. कारण चप्पल आणि बूट हे नात्यात दूरावा आणू शकते.

  • अनेकजण पार्टनरला परफ्युम गीफ्ट देतात पण पार्टनरला चुकूनही परफ्युम गीफ्ट करू नका. परफ्युम नात्यात दूरावा निर्माण करतं