Valentines Day : हॅप्पी-हेल्दी रिलेशनशिप हवयं? फॉलो करा या 5 सवयी

या व्हॅलेंटाईन डे 2022 मध्ये, कपल्सने हेल्दी लाइफ जगण्यासाठी काही संकल्प केले पाहिजेत.
Couples
Couplesesakal
Summary

या व्हॅलेंटाईन डे दिवशी, तुमच्या पार्टनरसोबत एकत्र राहण्याचे आणि आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याचे वचन द्या, ज्यामध्ये आरोग्याचा (Health) समावेश आहे.

व्हॅलेंटाईन वीक (Valentine Week) सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. दरवर्षीप्रमाणे प्रेमात पडलेले कपल्स (Couples) व्हॅलेंटाईन डे (Valentines Day) साजरा करण्यासाठी आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी आतुरतेने वाट पाहतात. या व्हॅलेंटाईन डे दिवशी, तुमच्या पार्टनरसोबत एकत्र राहण्याचे आणि आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याचे वचन द्या, ज्यामध्ये आरोग्याचा (Health) समावेश आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात हेल्थ (Health) आणि फिटनेसकडे (Fitness) दुर्लक्ष होत आहे. या व्हॅलेंटाईन डे 2022 मध्ये, आपण हेल्दी आणि निरोगी जीवन जगण्यासाठी काही संकल्प केले पाहिजेत.

Couples
'व्हॅलेंटाईन डे'ला प्रचंड वाढणारा ट्रेंड... वाचा 

व्हॅलेंटाईन वीकपासून या सवयी लावा

जंक फूडपासून दूर राहा

असे नाही की तुम्ही जंक फूडपासून (Junk food) पूर्णपणे लांब जावे, परंतु तुम्ही ते किमान सेवन करण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकता. मिठाई आणि प्रोसेस्ड फूड्स वगळता तुम्ही पौष्टिक अन्नपदार्थ असल्याची खात्री तुम्ही एकमेकांना केली पाहिजे.

एका फिजिकल अॅक्टिव्हिटीमध्ये (Physical activity) व्यस्त रहा

याचा अर्थ असा नाही की तुम्हाला जिममध्ये जावे लागेल. अशावेळी तुम्ही तुमचा आवडता खेळ एकत्र खेळू शकता! तुमच्या बिझी शेड्युलमुळे तुम्ही टाइम मॅनेजमेंट करू शकत नसाल, तर तंदुरुस्त (फिट) राहण्यासाठी एकत्र वेगाने वॉकिंग किंवा जॉगिंग करा. एकत्र व्यायाम करणे देखील कपल्ससोबत काही क्वालिटी टाइम घालवण्याचा एक उत्तम मार्ग आहे.

Couples
‘व्हॅलेंटाईन डे’ निसर्गाच्या सान्निध्यात साजरा करण्याचा ट्रेंड

हेल्दी रुटीन तयार करा

लाइफमध्ये हेल्दी रुटीन (Healthy Routine) तयार करणे खूप महत्वाचे आहे. तुमच्याकडे चांगला आहार आणि एक्सरसाइज रुटीन असल्याची खात्री करा आणि एकमेकांना ते फॉलो करण्यास प्रोत्साहित करा.

दररोज किमान एक हेल्दी फूड खा

दोघांनाही हेल्दी राहण्यासाठी प्रेरित करणे ही तुमच्या जोडीदारासोबत तुम्ही करू शकणार्‍या सर्वोत्तम गोष्टींपैकी एक आहे. तुम्ही कितीही व्यस्त असलात तरीही एकत्र बसून सकस अन्न खा.

तुमच्या वाईट सवयी पॉइंट ऑउट करा

अनेक वेळा आपण अनहेल्दी सवयी अंगीकारतो, ज्यात दारु पिणे, धूम्रपान करणे आणि जंक फूड खाणे इ. हे तुमचे कामाचे ठिकाण, सहकाऱ्यांचे दबाव, मित्र किंवा इतर कोणत्याही कारणामुळे असू शकते. एकमेकांच्या वाढत्या वाईट सवयींवर लक्ष ठेवणं आणि त्यांचं भान ठेवणं गरजेचं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com