Teddy Day : प्रेम अन् टेडीचे असे आहे खास नाते

जाणून घ्या टेडी बिअरचा इतिहास
Teddy Day Special Blog
Teddy Day Special Blogesakal

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवसापासून गुलाबी थंडीसोबत गुलाबी प्रेमाचा आठवडा (Valentines Week) जगभर साजरा होतो. 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारीपर्यंत दररोज जोडपे वेगवेगळ्या प्रकारे डे साजरे करतात. हे सात दिवस जोडप्यांसाठी खास आहेत. पहिला दिवस रोज डे, नंतर प्रपोज डे, चॉकलेट डे आणि चौथा दिवस असतो टेडी डे. विशेष करुन लहान बाळांना आणि मुलींना गोड दिसणारे अन् मनाला आकर्षक वाटणारे टेडी खूप आवडतात. अनेकांच्या मनात प्रश्न पडतो की या प्रेमी युगुलाच्या खास दिवसांवर टेडी डे का साजरा केला जातो. प्रेम आणि खेळणी यांचा काय संबंध? तुमच्याही मनात हाच प्रश्न असेल, तर यावेळी टेडी डे साजरा करण्यापूर्वी जाणून घ्या, की टेडी डे (Teddy Day) कधी आणि का साजरा केला जातो?

Teddy Day Special Blog
त्यानं दिलेल्या टेडी बियरच्या रंगावरुन ओळखा मनातील भाव

टेडी डे कधी साजरा केला जातो? (When We Celebrate Teddy Day

वर्षातील सर्वात रोमँटिक आठवडा 7 फेब्रुवारीपासून सुरू होतो. यामध्ये चौथ्या दिवशी टेडी डे साजरा केला जातो. म्हणजेच 10 फेब्रुवारीला लोक टेडी डे साजरा करतात. टेडी डे ला आपल्या पार्टनरला खूश करण्यासाठी टेडीनं आपल्या घराला सजवू शकता. बाजारात अनेक रंगांचे टेडी उपलब्ध आहेत. यात लाल, गुलाबी आणि पांढऱ्या रंगांचे टेडी सर्वात आवडते असतात. लाल रंग प्रेमाचं प्रतिक मानला जातो, त्यामुळं लाल रंगाचा टेडी आपण आपल्या प्रिय व्यक्तिला देऊ शकता. तर गुलाबी रंग खासकरुन मुलींना खूप आवडतो, त्यामुळं त्या रंगाचा टेडी देखील आपण भेट करु शकता.

टेडी बिअरचा इतिहास (History of Teddy Day)

14 नोव्हेंबर 1902 रोजी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष थिओडोर रुझवेल्ट मिसिसिपीच्या जंगलात शिकार करायला गेले होते. त्याच्यासोबत असिस्टंट होल्ट कॉलियर होते. येथे कॉलरने जखमी काळ्या अस्वलाला पकडले आणि झाडाला बांधले. त्यानंतर असिस्टंटने अध्यक्षांकडे अस्वलाला गोळी घालण्याची परवानगी मागितली. पण अस्वलाला जखमी अवस्थेत पाहून अध्यक्ष रुझवेल्ट यांचे हृदय द्रवले आणि त्यांनी प्राण्याला मारण्यास नकार दिला. 16 नोव्हेंबर रोजी, द वॉशिंग्टन पोस्ट वृत्तपत्राने व्यंगचित्रकार क्लिफर्ड बेरीमन यांनी तयार केलेल्या घटनेवर आधारित एक छायाचित्र प्रदर्शित केले.

Teddy Day Special Blog
गर्लफ्रेंडला टेडी बेअर देताय? आधी हे वाचा

त्याचे नाव टेडी का ठेवले गेले?

वृत्तपत्रातील चित्र पाहून व्यापारी मॉरिस मिचटॉम यांनी अस्वलाच्या आकारात एक खेळणी बनवण्याचा विचार केला. त्यांनी त्यांची पत्नी रोजसोबत मिळून त्याची रचना केली. या खेळण्याला 'टेडी' असे नाव देण्यात आले. टेडी या नावामागील कारण म्हणजे राष्ट्राध्यक्ष रुझवेल्ट यांचे टोपणनाव टेडी होते आणि ही खेळणी राष्ट्रपतींना समर्पित होती म्हणून व्यावसायिक जोडप्याने त्यांचे नाव वापरण्याची परवानगी घेऊन ते सुरू केले.

टेडी डे का साजरा केला जातो? (Why We Celebrate Teddy Day)

टेडी बिअरचा शोध अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थिओडोर यांच्या नावामुळेच लागला. एका व्यावसायिक जोडप्याने ते तयार केले. व्हॅलेंटाईन वीकमध्ये टेडी डे साजरा करण्यामागे मुलीच कारणीभूत असतात. खरं तर बहुतेक मुलींना सॉफ्ट टॉय आवडतात. मुले टेडी बिअर भेट देऊन त्यांच्या प्रेयसीला प्रभावित करतात म्हणून 10 फेब्रुवारीला टेडी डेचा देखील व्हॅलेंटाईन वीकमध्ये समावेश करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com