Vastu Tips घरातील टॉयलेट कुठे असावं? घरात शांती राहण्यासाठी ही दिशा महत्वाची

वास्तूशास्त्रानुसार टॉयलेट ही अशी जागा आहे जिचे तुमच्या घरावर सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही परिणाम दिसून येत असतात
टाॅयलेट कुठं असावं
टाॅयलेट कुठं असावंEsakal

अलिकडे सर्वच घरांमध्ये टॉयलेट म्हणजेच शौचालय आणि बाथरुमची सोय असते. शहरी भागात जागे अभावी अनेकदा टॉयलेट आणि बाथरुम एकत्रच असल्याच पाहायला मिळत. तसचं कमी जागेत टॉयलेट बाथरुम बांधताना ती चुकीच्या ठिकाणी बांधलं जातं. वास्तूशास्त्रानुसार टॉयलेट ही अशी जागा आहे जिचे तुमच्या घरावर सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही परिणाम दिसून येत असतात. Vastu Tips Marathi Toiled position in Home

घरात शांती आणि सकारात्मकता Positivity कायम राहण्यासाठी घरातील टॉयलेटची दिशा महत्वाची आहे. वास्तूनुसार तुमच्या टॉयलेटमध्ये Toiles दोष असल्यास घरातील सदस्यांना समस्या निर्माण होवू शकता. आजारपण तसचं पैशांच्या Money अडचणींचा यामुळे सामना करावा लागू शकतो. टॉयलेट म्हणजेच आपण जिथे मल-मूत्र विसर्जन करतो. विसर्जनासाठी दक्षिण-पश्चिम दिशा योग्य मानली जाते. Vastu Tips for Toilet direction या समस्यापासून दूर रहाण्यासाठी काही वास्तू टिप्स

बाथरुमची दिशा- घरातील कचरा हा कायम उत्तर-पश्चिम दिसेला ठेवला जातो. यासाठीच कधीही तुमच्या घराच बाथरुम हे उत्तर-पश्चिम कोपऱ्यात किंवा उत्तरेला असावं. यामुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा येण्यास प्रतिबंध होतो आणि घरात सकारात्मकता टिकून राहते. 

टाॅयलेट सीटची दिशा-  टॉयलेटच्या दिशेसोबतच टॉयलेटमधील टॉयलेट सीटची दिशा देखील महत्वाची आहे. टॉयलेट सीट नेहमी अशी असावी जेणे करून तिचा वापर करणाऱ्याचा चेहरा हा उत्तर किंवा दक्षिण दिशेला असेल. यामुळे कुटुंबातील सदस्यांचं आरोग्य चांगलं राहिल. Toilet Seat Direction As Per Vastu

या दिशेला टॉयलेट असणं अयोग्य- घरातील पूर्व किंवा उत्तर-पूर्व कोपरा हा धार्मिक किंवा अध्यात्मिक कार्यासाठी योग्य मानला जातो. घरातील या कोपऱ्यांमध्ये कधीच टॉयलेट असू नये. यामुळे घरातील सदस्यांना समस्या निर्माण होवू शकतात. तसचं घरातील समृद्धीवर त्याचा प्रतिकूल परिणाम दिसून येतो. Right direction for toilet seat

हे देखिल वाचा-

टाॅयलेट कुठं असावं
Vastu Tips : चिमूटभर अक्षता घालवतील तुमचा वास्तू दोष अन् होईल भरभराट

महिलांच्या आरोग्यावर परिणाम- प्राचीन काळात महिला तसंच पुरुषांसाठी वेगवेगळ्या शौचालयाची सोय असायची. आता मात्र तसं करणं शक्य होत नाही. यामुळे घरात महिला अधिक असतील तर त्यांचा विचार करून टॉयलेट असेल याची काळजी घ्यावी. महिलांसाठी दक्षिण-पश्चिम, दक्षिण-पूर्व आणि दक्षिण बागात असू नये. यामुळे महिलांच्या स्वास्थ्यावर हानिकारक प्रभाव पडतो.

टायलेट सीटच्यावर खिडकी असावी- शौचालयाचं ची पुढील बाजू ही घराच्या उत्तरेस असावं. आणि टॉयलेट सीटच्या बरोबर वर खिडकी असावी.

टॉयलेट उंचावर असावं- वास्तूशास्त्रानुसार घरातील टॉयलेटची दिशा ठरल्यानंतर ते घराच्या पृष्ठभागापासून किंचित उंच असावं. मात्र काही वेळेला असं करणं घराच्या डिझायइनमुळे शक्य होत नाही. अशावेळी टायलेटची आतून उंची वाढवून किंवा एखादी पायरी ठेवून टॉयलेट सीट उंचावर बसवावी. 

पाणी जाण्याची योग्य व्यवस्था- घरातील टॉयलेटची तसचं वॉशबेसिनची ड्रेनेज सिस्टिम पश्चिम दिशेला असावी. मुळात तुमच्या घरातील सर्वच ड्रेनेड पाईप एकाच म्हणजेच पश्चिम दिशेला असावे. 

टॉयलेट/बाथरुमची दारं लाकडी असावी- धातूमुळे तुमच्या टॉयलेटमधील ऊर्जा लिव्हिंग रुममध्ये येते आणि इथल्या सकारात्मक उर्जेवर प्रभाव टाकते. यासाठीच टॉयलेटला लाकडी दार असावं जेणेकरून नकारात्मक उर्जेचा प्रभाव कमी होईल. 

घराच्या मध्यभागी टॉयलेट नसावं- घरातील मध्यभागी अधिक ऊर्जा असते शिवाय याला ब्रह्मस्थान मानलं जातं.यासाठीच कधीही टॉयलेट सीट किंवा बाथरुम घराच्या मध्यभागी नसावं. कमर्शियल ऑफिसमध्येही मध्यभागी टॉयलेट असू नये.

हे देखिल वाचा-

टाॅयलेट कुठं असावं
Vastu Tips : घरात अडचणींचा डोंगर कोसळलाय, वास्तू दोष तर नाही ना? असं करा चेक!

वास्तूशास्त्रानुसार टॉयलेट आणि बाथरुम वेगवेगळे असावे - अलिकडे जागेच्या अडचणीमुळे असं करणं अनेक घरांमध्ये कठीण झालं आहे. मात्र शक्य असल्यास टॉयलेट बाथरुम वेगवेगळे असतील याची काळजी घ्यावी. 

बाथरुमचा रंग- टॉयलेट किंवा बाथरुमसाठी फिके म्हणजेच पांढरा, क्रिम, बेज असे रंग निवडावे. तसचं लाल किंवा निळा रंग असू नये. टॉयलेट फरश्यांसाठीदेखील फिके रंगच निवडावे, भडक रंगांमुळे नकारात्मकता वाढते. Right colour for toilet 

घर बांधत असतानाच वास्तूशास्त्राशी निगडीत या बाबींचा विचार करणं गरजेचं आहे. अन्यथा घरात अशांती आणि नकारात्मकता पसरू शकते. शिवाय शक्य असल्यास वेळीच हवे ते बदल करून वास्तू दोष दूर करणंही अनेकदा शक्य असतं. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com