
नवरात्रौत्सवाची सांगता दसरा सणाने होते. हा दसऱ्याचा सण संपन्न झाल्यानंतर आपल्या सगळ्यांना वेध लागतात ते दिवाळीचे. दिवाळी हा सण आनंदाचा, प्रकाशाचा आणि दिव्यांचा सण आहे. या दिवाळी सणाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात.
दिवाळी सणाची सुरूवात वसुबारस या दिवसाने होते. हा दिवस गायींसाठीचा आहे. या दिवशी गायीची पूजा केली जाते. तिला नैवेद्य दाखवला जातो. या दिवासाला खास असेल पौराणिक महत्त्व आहे. ते जाणून घेऊयात.
आजच्या दिवशी गाईची पूजा करण्याचा परिपाठ आहे. गुरांच्या शिंगांस रंग व बेगड लावून अंगावर लाल रंगाचे ठिपके देतात. त्यांची पूजा केल्यावर त्यांना गळयास एक पोळी व नारळाची कवड बांधून दवडतात. गवळ्यांस या दिवशी पैसे देण्याचा कर्नाटकात परिपाठ आहे. या दिवशी गवळी व गुराखी गाई म्हशी वगैरे जनावरांस दिवे ओवाळतात व गुरांचे मालक त्यांस ओवाळणी घालतात. ही रूढी सर्व महाराष्ट्रात आहे.
गोधनास हिंदुधर्मात फार मौल्यवान गणिले आहे. प्रत्येक प्रापंचिकाच्या घरी सवत्स धेनु असणे अत्यंत आवश्यक आहे, असे समजतात. जिच्या दूध दुभत्यावर मुलेबाळे पुष्ट होतात त्या गाईबद्दल अत्यंत आदराची भावना असते.
वेदकाली गोधनाच्या प्राप्तीसाठी फार फार धडपड चाललेली असे. हजारो गाईंचे कळप शत्रूपासून जिंकून आणिल्याची उदाहरणे वेदांत सापडतात. गोदान हे अत्यंत श्रेष्ठ दान मानिले जात असे.
सहस्रं मे ददतो अष्टकर्ण्यः ॥ ऋ. १०-६२-७
ज्या गाईच्या कानांवर आठांची खूण डागलेली आहे अशा हजार गाई दान दिल्याबद्दलचा हा उल्लेख आहे. वेदकाली त्याचप्रमाणे उपनिषत्काली व पुढे पुराणकाली देखील गोधनाचे महत्व आढळते.
गायीस गोमाता म्हणत असून तिला अत्यंत पवित्र मानतात. गाईच्या ठिकाणी सर्व देवता अधिष्ठित आहेत असे प्रत्येक हिंदु समजतो. म्हणूनच गोपूजेचा प्रकार या देशात चालू झाला. गोपूजा करणारे किती तरी लोक या देशात आहेत. गोपूजे- मुळे संतति, संपत्ति, आरोग्य व सौभाग्य यांची प्राप्ति होते असे आमचा स्त्री- समाज मानीत असतो.
भारतात निरनिराळ्या ठिकाणी वर्षातून एकदातरी गोपूजा केली जाते. महाराष्ट्रात आश्वीन व ।। १२ स गोवत्स द्वादशी असे नांव आहे. गुजराथेत श्रावणात गोवत्स द्वादशी म्हणतात. कार्तिक शु अष्टमीस महाराष्ट्रात गोपाष्टमी पाळतात. श्रावणात बंगालात बहुला असे नांव असून त्या दिवशी गोपूजा केली जाते. त्याचप्रमाणे पूर्व बंगाल्यात ज्येष्ठ शु. २ स गोपूजा करतात.
दक्षिण हिंदुस्थानात मकरसंक्रमणाच्या दिवशी पोंगल म्हणून सण पाळतात तोही गायींप्रीत्यर्थ आहे. कोंकणात आषाढ किवा कार्तिक महिन्यात गोपूजा केली जाते. तेथे या सणास बेंदूर असे नांव आहे.
दक्षिण महाराष्ट्रात श्रावण किंवा भाद्रपद पौर्णिमेस पोळा नांवाचा गोपूज- नोत्सव होतो याचे वर्णन मागे आले आहे. याप्रमाणे गोपूजेचे महत्व या देशात विशेष मानिले जाते. गोपूजेवरून चित्रित गोपाद पूजा, गोदान वगैरे गोष्टींचा आमच्या धार्मिक कृत्यांत समावेश झालेला आहे.
प्रस्तूत माहिती लेखक ऋग्वेदी यांच्या ‘आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास’ या पुस्तकातून घेण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.