
Vettangudi Villagers Celebrate Cracker-Free Diwali for Birds
sakal
Vettangudi Bird Sanctuary: दिवाळीतील फटाक्यांमुळे राजधानी दिल्लीसह प्रमुख शहरांचा श्वास घुसमटला असताना, तमिळनाडूतील एका छोट्याशा खेड्याने दीपोत्सव कशा पद्धतीने साजरा करायचा याचा आदर्श वस्तूपाठच घालून दिला आहे. शिवगंगा जिल्ह्यातील वेतांगुडी या खेड्यातील गावकरी हे मागील पन्नास वर्षांपासून स्थलांतरित पक्ष्यांना त्रास होऊ नये म्हणून फटाके फोडणे टाळतात. याच गावापासून प्रेरणा घेत अन्य गावांनीही फटाक्यांवर फुली मारली आहे.