esakal | COVID-19 : व्हॉट्स अ‍ॅपवरुन करता येणार लसीकरणासाठी नोंदणी? 

बोलून बातमी शोधा

COVID-19 : व्हॉट्स अ‍ॅपवरुन करता येणार लसीकरणासाठी नोंदणी? 

आरोग्य मंत्रालयाने केला महत्त्वाचा खुलासा

COVID-19 : व्हॉट्स अ‍ॅपवरुन करता येणार लसीकरणासाठी नोंदणी? 
sakal_logo
By
शर्वरी जोशी

देशात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे देशातील वाढती रुग्णसंख्या पाहता प्रशासन सतर्क झालं असून लसीकरणाची मोहीम मोठ्या संख्येने वाढवली आहे. तसंच वारंवार नागरिकांमध्येही जनजागृतीही करण्यात येत आहे. या सगळ्यामध्ये सोशल मीडियावर लसीकरणासंदर्भात अनेक अफवा पसरल्याचं दिसून येत आहे. यामध्येच आता व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून लसीकरणासाठी नोंदणी करता येऊ शकते असं सांगण्यात येत आहे. मात्र, ही माहिती खोटी असून ती अफवा असल्याचा खुलासा आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आला आहे.

अलिकडेच आरोग्य मंत्रालयाकडून एक ट्विट करण्यात आलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी व्हॉट्स अ‍ॅपवरुन लसीकरणासाठी नाव नोंदणी करता येऊ शकत नाही हे स्पष्ट शब्दांमध्ये सांगितलं आहे. तसंच सोशल मीडियावर व्हायरल होणारा मेसेज किंवा माहिती चुकीची व खोटी असल्याचं सांगितलं आहे.

"ही माहिती पूर्णपणे खोटी असून अशा मेसेजला बळी पडू नका. त्यामुळे लसीकरण केंद्रात जा आणि तेथे जाणून लस घ्या", असं ट्विट आरोग्य मंत्रालयाने केलं आहे.

हेही वाचा : COVID Tongue : ओठांभोवती पाच लक्षणं जाणवल्यास कोरोना चाचणी नक्की करा

नेमकी कोणती माहिती व्हायरल होत आहे?

सध्या सोशल मीडियावर एक मेसेज तुफान व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये आता व्हॉट्स अॅप क्रमांकाच्या आधारे लसीकरणासाठी नाव नोंदणी करता येऊ शकते असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे घरबसल्या केवळ व्हॉट्स अॅपवरुन व्हॅक्सिनेशनची अपॉइमेंट मिळणार असल्याची चर्चा नेटकऱ्यांमध्ये रंगली आहे.