
Viral Skincare Hacks: चेहरा चमकदार आणि गोरा असावा असं सर्वांनाच वाटते. महागड्या ब्युटी प्रोडक्टपेक्षा घरगुती उपाय चेहरा चमकदार बनवतात. हे सोपे आणि उत्तम उपाय हानिकारक नसतात. जसे की हळद आणि मध पेस्ट चेहरा उजळ बनवते. कोरफड जेल त्वचेला थंडावा देते. गुलाबजल त्वचेला ताजेपणा देते. मधामध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म असतात, जे चेहरा स्वच्छ करण्यास मदत करतात.
पण कधीकधी, विचार न करता, तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर काही अशा गोष्टी लावता, ज्यामुळे तुमच्या त्वचेला फायदा होण्याऐवजी नुकसान होते. आजच्या काळात अनेक लोक चमकदार त्वचेसाठी काय कराव याबाबत सोशल मिडियावर व्हिडिओ टाकतात. पण पुढील 5 पदार्थ चेहऱ्यासाठी घातक ठरू शकतात.