esakal | ८ हजार फूट उंच हवेत गिटार वाजवत त्याने व्यक्त केलं देशप्रेम

बोलून बातमी शोधा

man sings maa tujhe salaam

८ हजार फूट उंच हवेत गिटार वाजवत त्याने व्यक्त केलं देशप्रेम

sakal_logo
By
शर्वरी जोशी

देशात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं आपल्या राष्ट्रावर, येथील संस्कृतीवर प्रेम असतं. त्यामुळे अनेक जण विविध पद्धतीने त्यांचं राष्ट्रप्रेम व्यक्तही करत असतात. कोणी देशभक्तीपर गीतांमधून त्यांचं देशप्रेम व्यक्त करत असतात. तर, कोणी उंच पर्वतावर किंवा हिमालयावर जाऊन देशाचा ध्वज फडकवून देशाप्रतीचा आदर व्यक्त करत असतात. यामध्येच सध्या सोशल मीडियावर अशाच एका देशभक्ताची चर्चा रंगली आहे. एका तरुणाने चक्क ८ हजार फूट उंच हवेमध्ये देशभक्तीपर गीत गायलं आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

रुपेश मैती नामक एका व्यक्तीने हिमाचल प्रदेशात पॅराग्लाइडींग करत देशभक्तीपर गीत सादर केलं आहे. या घटनेचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये रुपेश ८ हजार फूट उंच हवेत तरंगत असून त्याने गिटार वाजवत 'माँ तुझे सलाम' हे गाणं सादर केलं.दरम्यान, ए. आर. रहेमान यांचं 'माँ तुझे सलाम हे' गाणं सादर करणाऱ्या रुपेश मैतीवर अनेकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. आतापर्यंत त्याच्या या व्हिडीओला २ हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले असून कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

दरम्यान,ए आर रहमान यांचं 'माँ तुझे सलाम हे' गाणं सादर करणाऱ्या रुपेश मैतीवर अनेकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. इतकंच नाही तर ए आर रहमान यांनीदेखील रुपेशची पाठ थोपटली असून त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर या व्हिडीओ शेअर केला आहे. तसंच आतापर्यंत त्याच्या या व्हिडीओला २ हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले असून कमेंट्सचा पाऊस पडत आहे.