esakal | लग्नानंतर वर्जिन राहण्यासाठी मुली उचलतायेत धोकादायक पाऊल
sakal

बोलून बातमी शोधा

लग्नानंतर वर्जिन राहण्यासाठी मुली उचलतायेत धोकादायक पाऊल
  • वर्जिनिटी टेस्टवरुन सुरू झाला वाद

  • UK मध्ये कडक कायदा लागू करण्याची मागणी

  • UK मधील संसद सभासदांनी उठविला आवाज

लग्नानंतर वर्जिन राहण्यासाठी मुली उचलतायेत धोकादायक पाऊल

sakal_logo
By
शरयू काकडे

इंग्लडमधील बर्नेलमध्ये वर्जिनिटी टेस्टच्या प्रकरणावर वाद वाढत चालला आहे. ब्रिटीश संसद सभासद एंटनी हिगिनबॉथम आणि त्यांची सहयोगी ब्रिटक्लिफ एका क्रॉस-पार्टी गठबंधनमध्ये सहभागी झाल्या आहे. त्या संसदमध्ये सतत हायमन रिपेअर थेरपी बेकायदेशीर घोषित करण्याची मागणी केली जात आहे. सध्या येथे वर्जिनिटी टेस्ट आणि हायमन रिपेअर सर्जरी दोन्ही कायदेशीर आहे.

हेही वाचा: कमला हॅरिस आणि नरेंद्र मोदींची प्रथमच होणार भेट

UK तील डॉक्टर्स वर्जिनिटी टेस्ट किंवा रिपेअरचे काम करतात. साधरणत: अरेंज मॅरेज करण्यापूर्वी मुली हे काम करतात. हिगिनबॉथम आणि मिस ब्रिटक्लिफ त्या 51 संसद सभासदांपैकी आहेत ज्यांनी संसद सभासद रिचर्ड होल्डनद्वारा सादर केलेल्या या दोन्ही प्रथांवर प्रतिबंध लावण्याच्या 'हेल्थ केअर बिल'वर हस्ताक्षर केल्या आहेत.

हिगिनबॉथम यांनी सांगितले की, '' 'महिला आणि मुलींना लग्नाच्या पहिल्या रात्री ब्लिडिंग व्हायला हवे' या विचारधारणेतून स्वत:ला मुक्त करायला हवं. या वेदनादायी प्रथांमागे कोणतेही वैज्ञानिक कारण नाही. अशा प्रथा महिलांचे फक्त नुकसान करतात आणि पवित्रतेच्या नावाखाली धोकादायक प्रथा निर्माण करतात. आपल्याला वर्जिनिटी टेस्टिंग आणि हायमन रिपेअर सर्जरी दोन्ही प्रथा थांबविण्यासाठी पाऊल उचलायला हवी. महिला आणि मुलींविरोधात होणाऱ्या या हिंसेचा अंत करण्यासाठी मी सरकारला विनंती करत आहे.''

हेही वाचा: 27 वर्षाच्या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास

या बिलावर हिगिनबॉथम आणि ब्रिटक्लिफ यांच्याकडून मिळणाऱ्या समर्थनामुळे होल्डन यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले,''हेल्थ अॅन्ड सोशल केअर बिलवर या कुप्रथांवर प्रतिबंध लावण्यासाठी सर्वात चांगली संधी आहे. महिला आणि मुलींच्या विरोधातील या हिंसेचा सामना करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे खूप चांगली गोष्ट आहे. ''

हेही वाचा: Hair Perfume | आता केसांसाठीही परफ्यूम, जाणून घ्या फायदे

रॉयल कॉलेज ऑफ ओब्स्टेट्रिशियन अॅन्ड गायनेकॉलिजिस्ट्स असोसिएशनचे म्हणणे आहे की, ''महिलांना या प्रक्रिया स्विकारण्यासाठी दबाव टाकला जातो किंवा मजबूरी म्हणून त्या हे पाऊल उचलतात. त्यांच्यावर दबाव असतो की, त्यांच्याकडून लग्नाच्या पहिल्या रात्री ब्लिडिंग व्हायला हवं जेणेकरून आपल्या नवऱ्यासमोर त्या कुमारी आहेत हे सिध्द होईल.'' या असोसिएशनने देखील महिलांच्या वर्जिनिटी टेस्टिंग आणि हायमनोप्लास्टी वर प्रतिबंध टाकण्याची मागणी केली आहे.

loading image
go to top