Airplane Travel : फक्त २०२३ रुपयांत करा विमानप्रवास; नव्या वर्षाची ऑफर

विस्तारा नवीन वर्षात स्वस्त विमान प्रवासाची संधी देत ​​आहे. टाटा समूहाच्या या विमान कंपनीची तीन दिवसांची विक्री सुरू झाली आहे.
Airplane Travel
Airplane Travel google

मुंबई : नवीन वर्ष साजरे करण्यासाठी तुम्ही दुसऱ्या शहरात जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठी एअरलाइन इंडिगो आणि प्रीमियम विस्ताराने वर्षाच्या शेवटी मोठी घोषणा केली आहे.

विस्तारा नवीन वर्षात स्वस्त विमान प्रवासाची संधी देत ​​आहे. टाटा समूहाच्या या विमान कंपनीची तीन दिवसांची विक्री सुरू झाली आहे. याअंतर्गत २९ डिसेंबरपर्यंत बुकिंग करता येणार आहे. या सेलमध्ये १० जानेवारी २०२३ ते ३० सप्टेंबर २०२३ पर्यंतच्या प्रवासासाठी तिकीट बुक करता येईल. हेही वाचा - जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

Airplane Travel
Travel Tips : विमानातून प्रवास करताना या गोष्टी लक्षात ठेवा

देशांतर्गत प्रवासासाठी एकेरी तिकिटाची किंमत फक्त २०२३ रुपये ठेवण्यात आली आहे तर आंतरराष्ट्रीय परतीच्या तिकिटाची किंमत १३ हजार ६९९ रुपयांपासून सुरू होत आहे.

यापूर्वी इंडिगोनेही तीन दिवसांचा हिवाळी सेलही आणला होता. या सेलमधील तिकिटाची किंमत फक्त २०२३ रुपये ठेवण्यात आली होती. एअरलाईन्सची विक्री शुक्रवार, २३ डिसेंबर ते २५ डिसेंबरपर्यंत चालली.

या सेलमध्ये १५ जानेवारी २०२३ ते १४ एप्रिल २०२३ पर्यंतच्या प्रवासासाठी तिकीट खरेदी करण्याची सुविधा देण्यात आली होती. देशात कोरोनाच्या कालावधीनंतर हवाई वाहतूक बर्‍याच प्रमाणात सामान्य झाली आहे. नवीन वर्षाची सुट्टी साजरी करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक विमानाने प्रवास करत आहेत. त्यामुळे देशातील अनेक विमानतळांवर प्रचंड गर्दी दिसून येत आहे.

Airplane Travel
Aviation Day : विमानातील दोन पायलट एकसारखे जेवण का जेवत नाहीत ?

विस्तारा एअरलाइन ही टाटा आणि सिंगापूर एअरलाइन्स यांच्यातील संयुक्त उपक्रम आहे. जानेवारी 2015 मध्ये त्यांनी पहिले उड्डाण केले. विस्तारा एअरलाइन्समध्ये टाटा समूहाचा 51 टक्के हिस्सा आहे आणि उर्वरित 49 टक्के हिस्सा सिंगापूर एअरलाइन्स (SIA) कडे आहे.

अलीकडेच सिंगापूर एअरलाइन्सने विस्ताराचे टाटा समूहाच्या एअरलाइन कंपनी एअर इंडियामध्ये विलीनीकरण करण्याची घोषणा केली. या विलीनीकरण करारांतर्गत, SIA एअर इंडियामध्ये 2,058.5 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com