
सुदृढ, निकोप मन आणि सकारात्मक दृष्टिकोन याचे प्रतिबिंब आपल्या चेहऱ्यावर दिसते म्हणूनच चेहऱ्याला मनाचा आरसा म्हटले आहे. निसर्गाने बहाल केलेले तारुण्य भराभर ओसरायला लागल्याच्या खुणा सर्वप्रथम जिथे दिसायला लागतात ते स्थान म्हणजे आपला चेहरा. चेहरा टवटवीत ठेवण्यासाठी महागड्या सौंदर्य प्रसाधनांची गरज नाही.