Passport बनवण्यासाठी आजच डाउनलोड करा DigiLocker अॅप, सर्व काम होतील झटपट

पासपोर्ट काढण्याच्या नव्या प्रक्रियेसाठी आता अर्जदाराला सर्वप्रथम डीजी लॉकर Digilocker हे शासनाचं अॅप डाउनलोड करावं लागणार आहे. या अॅपवर सर्व आवश्यक कागदपत्र अपलोड करावे लागतील
How to use Digilocker
How to use DigilockerEsakal

परदेशात प्रवास करायचा म्हंटलं तर पासपोर्ट असणं अनिवार्य आहे. पासपोर्ट काढण्यासाठी सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. अगदी जन्माचा दाखल, राहण्याच्या ठिकाणाचं अॅड्रेस प्रूफ, आधारकार्ड Aadhar Care, बँकेची माहीती आणि इतर अनेक दस्तावेज ओरिजनल कॉपीसह सोबत असणं गरजेचं आहे. Want to apply for new passport download Digilocker app first

५ ऑगस्टपासून पासपोर्ट Passport अॅप्लिकेशनच्या प्रक्रियेमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. यापूर्वी ऑनलाईन फॉर्म भरून पासपोर्ट मुलाखतीची तारीख मिळवता येत होती. या प्रक्रियेत फॉर्ममध्ये सामान्य माहिती भरण्याखेरीज कोणत्याही कागदपत्रांची पूर्तता करण्याची गरज नव्हती.

केवळ मुलाखतीवेळी सर्व दस्तावेज Documents सोबत बाळगणं गरजेचं होतं. मात्र आता या प्रक्रियेमध्ये थोडा बदल करण्यात आला आहे.

पासपोर्ट काढण्याच्या नव्या प्रक्रियेसाठी आता अर्जदाराला सर्वप्रथम डीजी लॉकर Digilocker हे शासनाचं अॅप डाउनलोड करावं लागणार आहे. या अॅपवर सर्व आवश्यक कागदपत्र अपलोड करावे लागतील. त्यानंतरच अर्जदाराला पासपोर्टची अधिकृत वेबसाइट www.passportindia.gov.in वरून पासपोर्टसाठी ऑनलाइन अप्लाय कराता येईल.

अर्जदारांसाठी देखील ही नवी प्रक्रिया सोयीची ठरणार आहे. कारण या प्रक्रियेमध्ये पासपोर्टसाठी अप्लाय करणाऱ्या अर्जदाराने डीजीलॉकरवर ओरिजनल डॉक्युमेंट्स अपलोड केल्यास त्याला प्रत्यक्ष मुलाखतीवेळी ओरिजनल कागदपत्र बाळगळ्याची आवश्यकता नाही. या प्रक्रियेमुळे आता पासपोर्ट काढणं अधिक सोप आणि सोयीचं होणार आहे.

हे देखिल वाचा-

How to use Digilocker
Henley Passport Index : व्हिसा नसेल तरी चालेल, भारतीयांना या 57 देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरण्याची मुभा

काय आहे Digilocker अॅप

Digilocker ही भारतीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाद्वारे प्रदान केरण्यात आलेली डिजिटल वॉलेट Digital Wallet सेवा आहे. यामध्य तुम्ही सरकारी दस्तावेज डिजिटल स्वरुपात सुरक्षित ठेवू शकता.

वापरकर्ता त्याच्या सोयीनुसार या डिजिटल लॉकरचा वापर करू शकतो. यामध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, जन्माचा दाखला, रेशन कार्ड, आधार कार्ड, शैक्षणिक मार्कशीट, मतदार कार्ड अशी अनेक कागदपत्र डिजीटल स्वरुपात अपलोड करून ठेवता येतात.

अनेक सरकारी ठिकाणी किंवा सरकारी फॉर्म भरतातना इतर कोणत्याही अॅपमधील तुमची कागदपत्र किंवा मोबाईलमधील कागदपत्रांचे फोटो ग्राह्य धरले जात नाहीत.

मात्र DigiLocker हे शासनाकडून प्रमाणित करण्यात आलेलं वॉलेट असल्याने या वॉलेटमधील कागदपत्रं सरकारी कामांसाठी ग्राह्य धरली जातात.

यासाठीच आता पासपोर्ट काढण्यासाठी देखील शासनाकडून ही नवी प्रक्रिया सुरू करण्यात आलीय. तेव्हा डीजी लॉकरमध्ये तुमचे सगळे महत्वाची कागदपत्र अपलोड करून ठेवा. जेणे करून पासपोर्ट काढणं सोप होईलच शिवाय इतर सरकारी कामांमध्य तुम्हाला गरजेच्यावेळी सर्व कागदपत्र सहज उपलब्ध होतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com