
Glowing Facemask For Bride and Groom: लग्नाचा दिवस प्रत्येक वधू- वरासाठी आयुष्यभर आठवणीत राहणारा क्षण असतो. त्या खास दिवशी सुंदर व तजेलदार दिसण्यासाठी त्वचेची योग्य काळजी घेणे महत्त्वाचे ठरते. केमिकलयुक्त उत्पादने त्वचेला हानी पोहोचवू शकतात, त्यामुळे नैसर्गिक घटकांपासून बनलेला मसूर डाळीचा फेसमास्क हा सर्वोत्तम पर्याय आहे. हा फेसमास्क त्वचेला पोषण देऊन तिला तजेलदार आणि उजळ बनवतो.