esakal | स्मार्ट आणि स्टायलिश दिसायचे आहे? या टिप्स तुमच्यासाठी
sakal

बोलून बातमी शोधा

स्मार्ट आणि स्टायलिश दिसायचे आहे? या टिप्स तुमच्यासाठी

स्मार्ट आणि स्टायलिश दिसायचे आहे? या टिप्स तुमच्यासाठी

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

पुणे: तुमचे प्रोफेशन कोणतेही असो मात्र तुम्ही स्मार्ट आणि स्टायलिश दिसायला हवे. कारण यातून तुमची एक इमेज तयार होते. मग बदलत्या काळात तुम्ही स्वतःला स्मार्ट आणि स्टायलिश लूक देऊ शकता हे जाणून घ्या.

मिक्स अँड मॅच करा

- यंदा खूप हलके आणि आरामदायक कपड्याची आवाक राहील. फाॅर्मल कपडे वापरणे कमी असेल. कारण कार्यालयात आताही रोस्टर पद्धतीने कर्मचारी येत आहेत. अशा स्थितीत मिक्स अँड मॅच करुन स्वतःला वेगळ लूक देऊ शकता. जसे की कुर्त्यासारखी दिसणाऱ्या ड्रेसला कधी वनपीस ड्रेस प्रमाणे कधी पँट किंवा पलाजोबरोबर टीमअप करु शकता. याच प्रमाणे स्पॅगिटी टाॅपला पलाजो, पँट किंवा स्कर्टबरोबर पिअर केले जाऊ शकते. जेव्हा तुम्ही फिल्डवर जात असाल किंवा मीटिंगला जात असाल तेव्हा याबरोबर थिन लिनेन जॅकेट किंवा श्रग टीमअप कर फाॅर्मल लूक मिळवू शकता.

सौम्य रंग

- या वर्षी रंगांच्या बाबतीतही कमी प्रयोग होताना दिसेल. खूप पांढऱ्याऐवजी म्युटेड कलर ट्रेण्ड करेल.

हेही लक्षात ठेवा

- हलके आणि सुदिंग कलर्स नेहमी चांगले दिसतात. कार्यालयात तुम्ही टील, ऑलिव, बेज, स्टोन ब्लू, ब्राऊन, पेस्टल ब्लू, ग्रे, ऑफ व्हाईट कलर्स ट्राय करु शकता.

- ज्वेलरीत शक्य तेवढे मिनिमिलिस्टिक लूक ठेवा. गळ्यात पातळ चेन, कानात स्टड, एका हातात घड्याळ नेहमी ठेवा.

- फुटवेअर्समध्ये एक इंच हिलची सँडल, फ्लॅट बेली शूज, प्लॅटफाॅर्म हिल शूज ट्राय करा.

- टाॅप किंवा कुर्त्यांची डिझाईनवर नेहमी लक्ष द्या. मोठ्या मोटिफच्या जागी छोटे डिझाईन असेल तर खूप चांगले राहील.

loading image