DTH: पहा 2 महिने फ्री TV; युजर्ससाठी असणार खास ऑफर

सकाळ ऑनलाईन टीम
Monday, 12 October 2020

ऑफरचा लाभ घेण्यासाठी वापरकर्त्यांना आयसीआयसीआय (ICICI) बँकेचे क्रेडिट किंवा डेबिट कार्डवरून रिचार्ज करावा लागणार आहे.

नवी दिल्ली: कोरोनाच्या काळात डीटीएच (DTH) वापरकर्त्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठी डीटीएच कंपनी टाटा स्काय (TATA Sky) वापरकर्त्यांना 2 महिन्यांची मोफत सेवा देत आहे. ही मोफत सेवा लाभ वापरकर्त्यांना कॅशबॅकच्या स्वरूपात दिली जाणार आहे. टाटा स्कायची मोफत सेवा फक्त आयसीआयसीआय बँकेच्या वापरकर्त्यांसाठी असणार आहे. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी वापरकर्त्यांना आयसीआयसीआय (ICICI) बँकेचे क्रेडिट किंवा डेबिट कार्डवरून रिचार्ज करावा लागणार आहे.

6 आणि 12 महिन्यांच्या रिचार्जवर ऑफर-
टाटा स्काय या ऑफरमध्ये 12 महिन्यांची सबस्क्रिप्शन घेणाऱ्या वापरकर्त्यांना 2 महिन्यांचा कॅशबॅक देत आहे. तर 6 महिन्यांसाठी रिचार्ज केला तर जात असताना, वापरकर्त्यांना कॅशबॅक म्हणून एक महिन्याचा रिचार्ज परत मिळत आहे.

7 दिवसांच्या आत मिळणार कॅशबॅक-
ही टाटा स्कायची ऑफर 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत वैध असणार आहे. ही ऑफर फक्त कंपनीच्या वेबसाइट आणि मोबाइल अॅपवरून केलेल्या रिचार्जसाठी उपलब्ध आहे. तसेच सात दिवसांच्या आत कॅशबॅक वापरकर्त्यांच्या खात्यात जमा केला जाईल, अशी माहिती कंपनीने दिली आहे. दोन महिन्यांच्या कॅशबॅक प्लॅनमध्ये रिचार्ज केल्यावर, पहिल्या महिन्याचा कॅशबॅक 48 तास आणि दुस-या महिन्याचा कॅशबॅक सात दिवसांच्या आत येईल.

तसेच या बँकेच्या कार्डवर ऑफर द्या-
टेलिकॉम टॉक रिपोर्टनुसार, टाटा स्कायचे खाते ऍक्टिवेशन करण्याच्या दिवशी केलेल्या रिचार्जसाठी ही ऑफर उपलब्ध नाही. बँक ऑफ बडोदाच्या क्रेडिट कार्डवरही टाटा स्कायची अशीच योजना दिली जात आहे. बँक ऑफ बडोदा कार्डवरील ऑफर 30 नोव्हेंबरपर्यंत वैध आहे. तुम्ही ऑफरशी संबंधित अधिक तपशीलासाठी कंपनीच्या वेबसाइटला भेट देऊ शकता, असं कंपनीने सांगितले.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: watch 2 month free tv offer for customer by dth company