esakal | कासवालाही गुडघेदुखीची समस्या; वाढलेल्या वजनामुळे चालणंही अशक्य
sakal

बोलून बातमी शोधा

viral video of tortoise

कासवालाही गुडघेदुखीची समस्या; वाढलेल्या वजनामुळे चालणंही अशक्य

sakal_logo
By
शर्वरी जोशी

वयोमानानुसार किंवा श्रमाची कामे करणाऱ्या अनेकांमध्ये गुडघेदुखी, पाठदुखी किंवा अन्य शारीरिक व्याधी उद्धभवल्याचं पाहायला मिळतं. साधारणपणे या शारीरिक व्याधी व्यक्तींमध्येच आढळून येतात.मात्र, एखाद्या प्राण्याला शारीरिक व्याधी असल्याचं ऐकलं आहे का? तर, निश्चितच अनेकांचं उत्तर नाही असंच असेल. प्राण्यांना दुखापत झाल्याच्या अनेक गोष्टी आपल्या कानावर पडत असतात. परंतु, कोणत्याही प्राण्याला पाठदुखी किंवा गुडघेदुखीची समस्या असल्याचं ऐकिवात नाही. यामध्येच सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक कासव चक्क गुडघेदुखीने त्रस्त असल्याचं सांगण्यात येत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक दुर्मिळ प्रजातीचं कासव गुडघेदुखीने त्रस्त असल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या त्रासामुळे त्याला चालणंदेखील कठीण झालं आहे. Helmuth असं या कासवाचं नाव असून वाढत्या वजनामुळे त्याचे गुडघे दुखत असल्याचं सांगण्यात येत आहे.

Helmuth या कासवाचं वजन १०० किलोग्राम असून त्याला गुडघेदुखीची समस्या निर्माण झाली आहे. वजन वाढल्यामुळे या कासवाला चालतादेखील येत नसल्यामुळे त्याला स्केटबोर्ड लावण्यात आले आहेत. Helmuth हा अफ्रिकन कासव आहे. वाढत्या वजनामुळे त्याचा सर्वाधिक भार पायांवर येत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस त्याच्या मांसपेशी कमकुवत होत आहेत.