Marriage Shopping: लग्नासाठी ज्वेलरी खरेदी करताय, लक्षात असू द्या 7 गोष्टी... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 सोने खरेदी करताय
Marriage Shopping: लग्नासाठी ज्वेलरी खरेदी करताय, लक्षात असू द्या 7 गोष्टी...

लग्नासाठी ज्वेलरी खरेदी करताय, लक्षात असू द्या 7 गोष्टी...

sakal_logo
By
टीम ई सकाळ

लग्न ठरल्यावर सगळ्यात महत्वाची असते ती खरेदी. लहेंगा, साडी यांची खरेदी खूप वेळ घेऊन पारखून केली जाते. मात्र दागिन्यांची खरेदी कपड्यांशी सुसंगत नसते. मुलीसाठी सोन्याचे दागिने भरपूर घेतले जातात. पण सगळेच दागिने ती लग्नात घालेल असे नाही. अशावेळी बजेट संपते. मग काय करायचे ते कळत नाही. तुम्हाला लग्नासाठी योग्य दागिने खरेदी करायचे असतील तर या टिप्स फॉलो करा.

आधी बजेट ठरवा

लग्नाच्या खरेदीसाठी जाण्यापूर्वी आधी घरातले सगळे एकत्र बसून बजेट ठरवा. असे केल्याने तुम्ही योग्य खर्च करू शकाल. मात्र जे बजेट ठरले आहे त्यातच खर्च करण्याचा प्रयत्न करा. त्याबाहेर जाऊ नका.

लग्नाची तारीख पक्की करा

लग्नाची तारीख निश्चित झाल्यानंतर दागिने खरेदी केल्यास अधिक चांगले होईल. दागिने खरेदीसाठी खूप वेळ जावा लागतो. रेडिमेड घेण्यापेक्षा स्वतच्या आवडीचे डिझाईन बनवून घेण्याचा विचार करा.तुम्ही आधीच खरेदी केलेल्या दागिन्यांमध्ये काही बदल करू इच्छित असाल, तर तुमच्याकडे किमान एक किंवा दोन महिने असावेत.

पहिल्यांदा दागिन्यांची खरेदी

जेव्हा तुम्ही लग्नाची खरेदी सुरू करता, तेव्हा सगळ्यात आधी नवर्या मुलीसाठी दागिन्यांची खरेदी करा. दागिने खरेदी केल्यावर लेहेंगा किंवा साडी खरेदी करा. असे केल्यास तुम्ही दागिने घेण्यासाठी जास्त बजेट खर्च झाले तरी घाबरणार नाही. उलट तुम्ही तुमच्या दागिन्यांच्या बरोबरीने ड्रेस कस्टमाईज करू शकाल.

जुन्या दागिन्यांना पसंती

आई, आजीने तुमच्यासाठी काही दागिने केलेले असतात. हे दागिने तुम्ही लग्नात वापरू शकतात. आजीच्या काळातल्या दागिन्यांचे डिझाईन आता बघायला मिळतेच असे नाही. तसेच ते शुद्धही असते. त्यामुळे सिल्कच्या साडीवर हे दागिने फार उठून दिसतात. त्यामुळे या पर्यायाचा नक्की विचार करा.

डिटेचेबल ज्वेलरी

डिटेचेबल ज्वेलरी घेतल्यास, तुम्ही ते नंतरही वापरू शकता. मोठे हार, कानातले, बांगड्या लॉकरमध्येच राहतात. त्यामुळे या गोष्टी लक्षात घेऊन लग्नाच्या दागिन्यांची खरेदी करावी.

चेहऱ्याला सूट होणारे दागिने

बिंदी,नथ, कानातले आदी गोष्टी खरेदी करण्यापूर्वी आधी घालून बघा. ते तुमच्या चेहर्याला शोभत असेल तर त्याची खरेदी करा. चेहऱ्याला शोभत नसेल तर अजिबात घेऊ नका.

चांगल्या जागी शॉपिंग करा

जर तुम्ही सोने खरेदी करत असाल तर ते चांगल्या आणि विश्वासार्ह ठिकाणाहून खरेदी करा. यामुळे तुम्हीही निर्धास्त असाल आणि लग्नात चांगले मिरवता येईल.

loading image
go to top