तुम्हाला माहिती आहे टुथपेस्टचे काय आहेत उपयोग?

टीम ईसकाळ
Wednesday, 7 October 2020

बऱ्याचदा भाजले की, त्यावर टूथपेस्ट लावण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, भाजल्यावरच नाही तर इतरही गोष्टींकरता टूथपेस्टचा वापर केला जातो.

नागपूर : दिवस उगवला आणि अंथरुणातून उठले की प्रत्येकाचे हात पोहोचतात टूथपेस्ट आणि टूथब्रशकडे. ही टूथपेस्ट अलिकडे प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाली आहे. फार पूर्वी दात स्वच्छ करण्यासाठी कडुलिंबाची काडी वापरली जायची. पुढे चुलीतल्या राखेने दात घासले जायचे.

हळुहळु या राखुंडीची जागा दन्तमंजनाने घेतली. लाल दन्तमंजनाने दात घासल्यानंतर बराचवेळ पर्यंत हिरड्यांना चुरचुरत राहायचे. त्याही नंतर काचेच्या बाटलीतले काळे दन्त मंजन आले. प्रत्येक घरी दिवसाची सुरुवात यापैकीच एखाद्याच्या सोबतीने होत असे.

साधारण २५-३० वर्षापूर्वी मध्यमवर्गीय घरात टुथपेस्टचा प्रवेश झाला. आणि आता तर टुथपेस्ट हे जगण्याचे अविभाज्य अंग झाले आहे. आता तर या उत्पादनामध्ये स्पर्धा आली आहे. विविध कंपन्या आणि त्यांच्या विविध टुथपेस्ट'. त्यांचे मार्केट'. त्यांच्या जाहीराती, असे खूप मोठे अर्थकारण या एका वस्तुभोवती फिरते.
आतापर्यंत आपल्याला टुथपेस्टचा दात स्वच्छ करणे एवढाच उपयोग माहिती होता. आता मात्र टुथपेस्टचे अनेक उपयोग असल्याचे लक्षात आले आहे. जाणून घेऊया टुथपेस्टच्या इतर उपयोगांविषयी.

बऱ्याचदा भाजले की, त्यावर टूथपेस्ट लावण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, भाजल्यावरच नाही तर इतरही गोष्टींकरता टूथपेस्टचा वापर केला जातो.

  • लॅपटॉप, मोबाईल किंवा टीव्ही स्क्रिनवरील स्क्रॅच मार्क टूथपेस्ट लावल्याने सहज निघतात.
  • चांदीवरील काळपटपणा निघून जाण्यासाठी टूथपेस्टनी पॉलिश करा आणि एका स्वच्छ कापडाने पुसून घ्या.
  • भिंतीवरील खडूचे डाग काढण्यासाठी टूथपेस्ट भिंतीवर लावा आणि थोडसे घासून घ्या. यामुळे भिंतीवरील खडूचे डाग निघून जाण्यास मदत होईल.
  • बुटाच्या रबरी सोलवरचे डाग घालवण्यासाठी टूथपेस्टचा वापर करा.
  • चामड्याच्या जॅकेट किंवा पर्सवरचे डाग काढण्यासाटी टूथपेस्टचा उपयोग करता येतो.
  • इस्त्रीची प्लेट खराब झाली असेल तर त्यावर थोडी टूथपेस्ट लावून घासा.
  • कार्पेटवर डाग पडले असल्यास टूथपेस्ट आणि ब्रशचा वापर करुन ते साफ करा.
  • कांदा आणि लसूण चिरल्यानंतर हाताला येणारी दुर्गंधी दूर करण्यासाठी टूथपेस्टने हात स्वच्छ करा.

संपादन - स्वाती हुद्दार

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What are the uses of toothpest?