तुमच्या लग्नात मी का नाही? मुलांनी असं विचारलं तर काय सांगायचं? | Parenting Tips | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तुमच्या लग्नात मी का नाही? मुलांनी असं विचारलं तर काय सांगायचं

तुमच्या लग्नात मी का नाही? मुलांनी असं विचारलं तर काय सांगायचं

Parenting : तुम्ही किंवा तुमच्या नातेवाईंकांना असा अनुभव नक्की घेतला असेल, जेव्हा पालक लग्नाचे फोटो पाहात असतात तेव्हा त्यांची मुलं (Child) एक प्रश्न हमखास विचारतात तो म्हणजे, ''तुमच्या लग्नात मी का नाही?'' अशा वेळी पालक (Parrents) ती गोष्ट मज्जा मस्करीमध्ये घेतात. ही गोष्ट मस्करी म्हणून सोडूनही देतात. पण जेव्हा मुलं पाहुण्यांसमोर किंवा घरातील मोठ्यांसमोर असे काही प्रश्न (offensive questions) विचारतात तेव्हा., त्याचे काय उत्तर दयावे हेच तुम्हाला समजत नाही. तुम्हाला याबाबत चिंता करण्याची काहीच गरज नाही. ही खूप साधारण गोष्ट आहे जीचा सामना प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी करावा लागतो. अशा वेळी पालकांनी कसे वागावे याच्या काही टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (What do when young children ask offensive questions in front of everyone)

मुलांशी मोकळेपणाने बोला

भारतामध्ये पालक मुलांसोहत सेक्स किंवा टॅबू समजल्या जाणाऱ्या विषयावर स्पष्टपणे बोलू शकत नाही. ज्यामुळे मुलांना कधीच माहिती नसते, कोणती गोष्ट, कधी आणि केव्हा विचारावी. पण या सर्व गोष्टी समजून घेण्याचे एक वय असते तेव्हाच तुम्ही मुलांसोबत मोकळेपणाने बोलले पाहिजे. तुमच्या मुलांसोबत या विषयांवर स्पष्टपणे बोलण्यामध्ये काही वाईट नाही. कारण इंटरनेट आणि मोबाईल मुलांना सहज उपलब्ध होते त्याचा वाईट परिणाम पाहायला मिळतात. तुमच्या मुलांना योग्य वयामध्ये गरजेनुसार काही गोष्टी समजावून सांगताना संकोच बाळगू नका.

हेही वाचा: संक्रांत अन् भोगीचं नातं काय? कशी बनवतात भोगीची भाजी

मुलांचे फ्रेन्ड बना

मुलं जेव्हा शाळेत जातात किंवा तुमच्या शेजारी कोणासोबत ओळख बनवतात तेव्हा त्यांना खूप सारे फ्रेन्ड बनतात पण याचा अर्थ असा नाही की, तुम्ही मुलांसोबत मैत्री करा.अर्थातच तुम्ही तुमच्या मुलांचे चांगले फ्रेन्ड बनू शकता आणि त्यांच्यासोबत काही गोष्टी शेअर करू शकत. त्यांना काही गोष्टी समाजावून सांगू शकता पण प्रत्येक गोष्ट समजावून सांगणे गरजेचे आहे.

हेही वाचा: Fashion Tips : स्टायलिश दिसायला आवडतं? मग हे आऊटफिट ट्राय करा

गप्पांमध्ये काही गोष्टी समजवा

मुलांसोबत गप्पा मारताना त्यांना सेक्स आणि पिरियड्स सारख्या टॉपिकवर थोडं थोडं नॉलेज देऊ शकता. त्यांना या सर्वाबाबत योग्य वयामध्ये माहिती देणे पालक म्हणून तुमची जबाबदारी आहे. रेप आणि छेडछेडाबाबत काही गोष्टींवर तुमच्या मुलांसोबत चर्चा करा आणि त्याचे दुष्परिणाम मुलांना सांगा. तसेच पॉक्सो अॅक्ट काय असतो याबाबत माहिती द्या.

या सर्व छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लक्ष देऊन तुमच्या मुलांना तुम्ही चांगले संस्कार देऊ शकता. लक्षात ठेवा तुमच्या मुल जेव्हा प्रश्व विचारतात तेव्हा त्यांना ओरडू नका किंवा काही लपवू नका. त्याऐवजी योग्य माहिती सांगा त्यामुळे तुमचे आणि मुलांचे नाते आणखी दृढ होईल.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :children
loading image
go to top