'ब्रेस्ट मिल्क ज्वेलरी' म्हणजे काय? एक कपंनी कमावतेय कोटी रुपये

मजेंटा फ्लॉवर्सची स्थापना 2019 केली आहे
Breast Milk Jewelry Company
Breast Milk Jewelry Company

जेव्हा लहान बाळाच्या आगमनाची चाहूल लागते तेव्हा आई-वडिलासंह घरातील सर्वांनाच खूप आनंद होतो. पाल आपल्या बाळाशी संबधित प्रत्येक आठवणी जपून ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी आई-वडिलांना खूप काही करतात. बाळाचे पहिले हसणे किंवा रडणे, पहिलं पाऊलाची आठवण सर्व काही जपण्याचा प्रयत्न करतात. मोबाईल फोनच्या काळात हे खूप सोपे झाले आहे. तेच काही महिला देखील आहेत जे आपल्या ब्रेस्ट मिल्क देखील सांभाळून ठेवतात आणि त्याचे दागिने)बनवितात. (Breast Milk Jewelry Company)

कित्येकांनी पहिल्यांदाच ब्रेस्ट मिल्क ज्वेलरीबाबत पहिल्यांदाच ऐकले असेल त्यांना विश्वास बसत नसेल पण ही गोष्ट १०० टक्के खरी आहेय युनायटेड किंगडममधील (United Kingdom) मॅजेन्टा फ्लॉवर्स(Magenta Flowers) या कंपनीचे संस्थापक साफिया आणि अॅडम रियाध (Safiyaa And Adam Riyadh)हे आईच्या दुधाचे दागिने बनवतात. याला ब्रेस्ट मिल्क ज्वेलरी (Breast Milk Jewellery ) असेही म्हणतात. त्यांचा व्यवसाय भरभराटीला येत आहे. (What is Breast Milk Jewelry A company earns crores of rupees)

Breast Milk Jewelry Company
तुमचे डोळे किती रंग ओळखू शकतात? उत्तर ऐकून बसेल धक्का

मॅजेन्टा फ्लॉवर्सच्या यशाची गोष्ट

काही लोकांना ही गोष्ट एकदम हास्यास्पद वाटू शकते पण ब्रेस्ट मिल्क एक विशेष आकर्षक उद्योग ठरू शकतो. सध्याच्या काळात लोक ब्रेस्ट मिल्कपासून दागिणे बनविण्याची क्रेझ सध्या वाढत आहे. साफिया आणि अॅडम रियाद यांनी याला एक यशस्वी व्यवसाय बनविले आहे. सन 2019 रोजी दोघांनी मॅजेन्टा फ्लॉवर्सची स्थापना केली. आतापर्यंत ही कंपनी दुनियापर्यंत ४ हजारपेक्षा अधिक आर्डर पूर्ण केल्या आहेत. नुकतेच या कंपनीने ब्रेस्ट मिल्क ज्वेलरीच विस्तार केला आहे आणि २०२३ पर्यंत कंपनी 1.5 मिलियनचा उत्पन्न करू शकते..

दागिन्यांमध्ये स्तनपानाच्या आठवणी जतन करण्याचा ट्रेंड वाढला आहे

जगभरातील मातांना त्यांच्या दुधापासून तयार केलेल्या मौल्यवान खड्यांमध्ये त्यांचे मातृत्व जपायचे आहे. त्यामुळे कंपनीने वार्षिक महसूल वाढीचे ४८३ टक्के उद्दिष्ट ठेवले आहे. तीन मुलांची आई असलेल्या सफियाला आधीच माहित आहे की, आईसाठी आपल्या मुलांना स्तनपान करणे किती संस्मरणीय आहे. जेव्हा बाळ आईचे दूध पिणे थांबवते तेव्हा आईला तो खूप आठवतो.'' साफिया सांगते की, ''स्तनपानामुळे आई आणि बाळामध्ये भावनिक बंध निर्माण होतो, जो कायम टिकतो. हे नाते स्मृतीचिन्ह म्हणून जपण्याचे काम मॅजेन्टा फ्लॉवर्स करत आहे.

Breast Milk Jewelry Company
TB Champions : 5 मुली भारताला करणार टीबीमुक्त, 'अशी' करतायेत जनजागृती

दागिन्यांचा रंग वर्षानुवर्षे बदलणार नाही

आईच्या दुधाचा रंग टिकून राहावा यासाठी मॅजेन्टा फ्लॉवर्स ‘ब्रेस्ट मिल्क फ्लेवर’साठी सतत संशोधन करत असते. त्यांनी बनवलेले दागिने वर्षानुवर्षे त्यांच्याच रंगात राहतील असा कंपनीचा दावा आहे.

साफिया म्हणते की, अनेक महिलांप्रमाणे मी स्वतःही आपल्या मुलांना जास्त काळ स्तनपान करू शकले नाही. अशावेळी तिला त्या आईची भावना, वेदना खूप चांगलीच समजते. आईचे दूध जपून ठेवता येते हे त्यांना माहीत नव्हते, जर त्यांना माहित असेल तर त्या क्षणाची आठवण म्हणून ती आई तिच्या दुधापासून दागिने बनवेल.

मॅजेन्टा फ्लॉवर्स आईच्या दुधापासून हार, कानातले, चार्म्स आणि अंगठ्या बनवते. जेव्हा एखादा ग्राहक दागिन्यांची ऑर्डर देतो तेव्हा साफिया त्यांना किमान 30 मिली आईचे दूध पाठवण्याचा सल्ला देते. कंपनी दागिन्यांचा प्रत्येक तुकडा सर्वात खास बनवण्याचा प्रयत्न करते. हे बाळाच्या नावासह किंवा रत्नासह असू शकते. ग्राहकांचे मत समजून घेऊनच कंपन्या दागिने बनवतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com