

Inside the Oscars ‘Everyone Wins’ Gift Bag Worth $350,000 for 2026 Nominees
sakal
Inside the Oscars ‘Everyone Wins’ Gift Bag Worth 3.23 Crore: हॉलिवूडमधील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार सोहळा मानला जाणारा ऑस्कर पुरस्कार सोहळा (Oscar Awards) नुकताच पार पडला. हे अॅवॉर्ड जिंकणं प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं. पण या सोहळ्यात एक मजेशीर गोष्ट अशी आहे की, ट्रॉफी मिळाली नाही तरी नॉमिनी रिकाम्या हाताने घरी जात नाहीत. यंदाच्या 98व्या ऑस्कर सोहळ्यात ट्रॉफी न जिंकणाऱ्या नॉमिनींसाठीही एक मोठी आणि लक्झरी भेट आधीच तयार ठेवण्यात आली होती. “Everyone Wins” म्हणून ओळखली जाणारी ₹3.23 कोटींची ही प्रसिद्ध गिफ्ट बॅग पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे.
लॉस एंजेलिसमधील एका मनोरंजन मार्केटिंग कंपनीकडून तयार करण्यात येणाऱ्या या एक्सक्लुसिव्ह गिफ्ट बॅगमध्ये अनेक लक्झरी उत्पादने आणि वस्तूंचा समावेश असतो. ऑस्कर नामांकन मिळालेल्या कलाकारांसाठी खास निवड करून ही बॅग तयार केली जाते. चला तर मग या एक्सक्लुसिव्ह गिफ्ट बॅगमध्ये नक्की असतं तरी काय...