Health Care : मेनोपॉजची सुरुवात कशी ओळखाल? 'या' लक्षणांकडे करु नका दुर्लक्ष

मासिक पाळीसोबतच प्रत्येक महिलेला रजोनिवृत्तीच्या अर्थात मेनोपॉजच्या टप्प्यातून जावेच लागते.
What is menopause
What is menopause esakal

प्रत्येक महिलेच्या आयुष्यात मासिक पाळी अतिशय महत्वाची आहे. या मासिक पाळीसोबतच प्रत्येक महिलेला रजोनिवृत्तीच्या अर्थात मेनोपॉजच्या टप्प्यातून जावेच लागते. त्यामुळे, रजोनिवृत्तीचा टप्पा हा महिलांसाठी अतिशय महत्वाचा आहे. रजोनिवृत्ती ही एक अशी स्थिती आहे, ज्यामध्ये स्त्रियांची मासिक पाळीची प्रक्रिया थांबते.

खरं तर हा मासिक पाळीचा शेवटचा टप्पा असतो. साधारणपणे ४५-५० वयाच्या महिलांमध्ये मासिक पाळी थांबते. जर एखाद्या महिलेची मासिक पाळी थांबली आणि ती पुढील १२ महिने आली नसेल तर ती महिला रजोनिवृत्तीच्या स्थितीमध्ये गेली आहे, असे मानले जाते.

आज आपण मेनोपॉज म्हणजे काय? आणि मेनेपॉजची लक्षणे कोणती आहेत? त्याबद्दल जाणून घेणार आहोत.

What is menopause
Menopause Care : रजोनिवृत्तीचा काळ सोपा करण्यासाठी रुजुता दिवेकरच्या टीप्स

मेनोपॉज म्हणजे काय ?

मेनोपॉज अर्थात रजोनिवृत्ती ही एक नैसर्गिक जैविक प्रक्रिया आहे. या रजोनिवृत्तीची सुरूवात साधारण ४५ ते ५० वर्षांच्या महिलांमध्ये होते. मात्र, कधीकधी रजोनिवृत्तीची सुरूवात ही वयाच्या ४० व्या वर्षीही होऊ शकते. ज्याला अकाली रजोनिवृत्ती असे म्हणतात.

रजोनिवृत्तीची सुरूवात होणे म्हणजे प्रत्येक महिन्याला येणारी मासिक पाळी पूर्ण बंद होणे. या प्रक्रियेला मेनोपॉज किंवा रजोनिवृत्ती असे म्हटले जाते.

What is menopause
Health Care News: महिलांनो.. तुम्हालाही PCOS चा त्रास होतोय? मग या हेल्दी स्मूदीजचा आहारात समावेश करा

एखाद्या महिलेला जर सलग १२ महिने मासिक पाळी आली नसेल तर ती रजोनिवृत्तीपर्यंत पोहचली आहे, असे म्हटले जाते. रजोनिवृत्तीपूर्वी महिलांमध्ये अनेक प्रकारची लक्षणे आढळून येतात.

रजोनिवृत्तीच्या काळामध्ये महिलांमध्ये इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन आणि टेस्टोस्टेरॉन हार्मोन्सची पातळी कमी होण्याची शक्यता असते. या दरम्यान स्त्रियांमधील प्रजननाची प्रक्रिया थांबते.

मेनोपॉजची लक्षणे कोणती ?

जेव्हा एखादी महिला रजोनिवृत्तीच्या वयामध्ये पोहचते, तेव्हा अनेक प्रकारची शारीरीक लक्षणे दिसू लागतात. मात्र, काही महिलांमध्ये ही लक्षणे दिसून येत सुद्धा नाहीत.

रजोनिवृत्तीची लक्षणे खालीलप्रमाणे

  • अनियमित मासिक पाळी

  • मासिक पाळी थांबणे

  • थरकाप होणे

  • निद्रानाश होणे

  • झोपेत अचानक घाम येणे

  • अंगावर ताप आल्यासारखे वाटणे

  • थकवा येणे

  • अशक्तपणा येणे

  • सांधेदुखी

  • हाडांमध्ये वेदना होणे

  • मासिक पाळीमध्ये तीव्र वेदना

  • छातीमध्ये दुखणे

  • शरीरात गरम वाफा जाणवणे

What is menopause
Hair Fall In Menopause: मेनोपॉजमुळे केस गळू लागले आहेत? मग हे उपाय करून पाहा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com