Women Jeans: कधी पासून महिला जीन्स घालू लागल्या? भारतात जीन्स कधी आली; वाचा तुमच्या लाडक्या पँटचा जबरदस्त इतिहास

आधी हिजाब बंदी आता चेंबूरच्या आचार्य-मराठे कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना जीन्स, टी शर्ट, जर्सीवर बंदी
When did denim jeans become fashionable for women interesting jeans history
When did denim jeans become fashionable for women interesting jeans history
Updated on

मुंबईच्या चेंबूर परिसरातील आचार्य-मराठी महाविद्यालय पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे. हिजाब बंदीनंतर महाविद्यालयाने नवा ड्रेसकोड लागू करत जीन्स, टी-शर्ट आणि जर्सीवर बंदी घातली आहे. त्यामुळं सोशल मीडियावर जीन्स हा विषय चर्चेला ठरला आहे. बंदी घातलेल्या या जीन्सचा नेमका इतिहास आहे तरी काय? हे जाणून घेऊया.

देशासह जगभरात असा एकही व्यक्ती नाही ज्याला जीन्स आवडत नाही. मुलगा असो वा मुलगी, जीन्स शिवाय कोणाचाच वार्डरोब पूर्ण होत नाही. भारतात जीन्स पॅन्ट घालणे म्हणजे फार मॉडर्न असल्याचा समज आहे.

त्यामुळे टॉप ब्रँडची जीन्स वापरण्याकडे भारतीयांचा कल अधिक असल्याचे पाहायला मिळते. कितीही वर्षे झाली तरी जीन्स काही खराब होत नाही.

उलट जीन्स जितकी जीर्ण तितकी तिची सुंदरता अधिक उठून दिसते. पण तुम्हाला माहितीय का ही जीन्स औद्योगिक कामगारांसाठी तयार करण्यात आली होती. इतकेच नव्हे तर जीन्सला असलेले छोटे पॉकेटसुद्ध त्या कामगारांसाठी खुप महत्त्वाचे होते.

तर जाणून घेऊया जीन्सचा रंजक इतिहास

कामगारांपासून ते फॅशन डिझायनर्सपर्यंत जीन्स प्रवास पाहायला मिळतो. १९व्या शतकात फ्रान्समधील निम्स या छोट्याशा गावात प्रथम जीन्स बनवण्यात आली होती. ज्या फॅब्रिकमधून जीन्स बनवली गेली त्याला फ्रेंचमध्ये "सर्ज" असे म्हणतात आणि त्यामुळे "सर्ज डी निम्स" हे नाव पडले. हे नाव लहान करून, जीन्सला "डेनिम" म्हटले जाऊ लागले

इटलीच्या जेनोवा शहरात या कापडाला जीन म्हणत म्हणून नाव पडलं “जीन्स”. याचा शोध जैकब डेविस आणि लीवाई स्ट्रॉस यांनी लावला. १८५१मध्ये लीवाई स्ट्रॉस जर्मनीहून न्यु यॉर्कला आले आपल्या मोठ्या भावाला व्यवसायात मदत करण्यासाठी.

दोन वर्ष त्यांनी भावाला मदत केली. १९५३ मध्ये सोन्याच्या नवीन खाणी शोधायची, खणण्याची सगळ्यांमध्ये चढाओढ सुरु झाली. बरेचसे पश्चिमी देश याच कामात लागले होते.

जेव्हा लीवाईला याबद्दल कळाले त्याने सॅन फ्रान्सिस्कोला जाऊन आपला व्यवसाय वाढवायचा निर्णय घेतला. तिथे त्याने कापडाच्या सोबतच तयार सुती कपडे विकायला देखील सुरुवात केली. तिथे एक जेकब डेविस नावाचा शिंपी होता त्याच्याकडे एका महिला कामगाराने मजबूत कापडाची पँट शिवून मागितली जेणेकरून मेहनतीच्या/मजुरीच्या कामाच्या वेळी तिला काही अडचण येणार नाही.

जेकबच्या डोक्यात यासाठी डेनिमची पँट शिवायची कल्पना आली. तसे कापड घेण्यासाठी तो लीवाई कडे गेला. पँटला मजबूत करण्यासाठी त्याने खिशांना वगैरे तांब्याचे छोटे छोटे खिळे ठोकले जेणेकरून पँट फाटणार नाही. ही कल्पना लोकांना फारच आवडली आणि जेकबने जीन्सचे पेटंट घेण्याचे ठरवले यासाठी त्याने लीवाईला पार्टनर म्हणून घेतले. दोघांनी मिळून एक फॅक्टरी उघडली. आणि अशाप्रकारे जीन्स बाजारात आली.

जीन्स सुरुवातीला खाणीत काम करणारे मजूर आणि काऊबॉइज वापरायचे. मग ही जीन्स प्रसिद्ध कशी झाली?

जीन्स सगळीकडे प्रसिद्ध होण्यामागे हॉलिवूड चित्रपट आहे. . १९५५ साली जेम्स डीन आपल्या Rebel Without a Cause या सिनेमात जीन्स, टी-शर्ट आणि लेदर जाकेट घालून दिसले. प्रेक्षकांना तो लूक फारच आवडला. आणि त्यानंतर लोकांनी जीन्स खरेदी करायला गर्दी केली.

तर जीन्सला छोटा खिसा का असतो?

जीन्समधील ही पॉकेट्स १८७९ मध्ये सुरू करण्यात आली होती. त्यापूर्वी जीन्स बनवल्या जात होत्या त्यामध्ये फक्त ३ खिसे असायचे, दोन समोर आणि एक मागे. खरं तर, 1800 च्या दशकात, लोक, विशेषत: काउबॉय, त्यांची चेन घड्याळे त्यांच्या कंबरेच्या खिशात ठेवत असत, परंतु, नंतर लेव्हीने जीन्समध्ये घड्याळे ठेवू शकणारी ही लहान पॉकेट्स तयार केली. या खिशांमुळे घड्याळे स्क्रॅच आणि पडण्याच्या भीतीशिवाय सहज ठेवता येतात. खुद्द लेवीच्या कंपनीच्या ब्लॉगवर याचा खुलासा करण्यात आला आहे.

कधी पासून महिला जीन्स घालू लागल्या?

1934 मध्ये महिलांसाठीही जीन्स बनवण्यात आली. पोस्टर लावून प्रचारही करण्यात आला. त्यावेळी महिलांना जीन्स घालणे सोयिस्कर वाटले. मिळालेल्या माहितीनुसार, महिलांमध्ये जीन्सची आवड निर्माण होण्याचे श्रेय अभिनेत्री मर्लिन मनरोला दिले पाहिजे. Misfits या त्यांच्या चित्रपटात त्यांनी जेम्ससारखाच लूक केला होता. आणि त्यानंतर महिलांमध्ये निर्माण झालेली जीन्सची क्रेझ आजतागायत कायम आहे.

भारतात पहिली जीन्स केव्हा आली?

भारतातील पहिली जीन्स 1986 मध्ये अरविंद माईल्सने आणली होती. त्यानंतर 1990 ते 2000 दरम्यान डेनिम जीन्सची फॅशन वाढू लागली. त्यावेळी देशातील श्रीमंत वर्ग झपाट्याने पाश्चिमात्य शैली स्वीकारत होता. अशा परिस्थितीत जीन्सची मागणीही वाढू लागली आणि मग अरविंद माईल्सशिवाय केजी डेनिम, मफतलाल डेनिम असे अनेक ब्रँड भारतात सुरू झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.