
Parshuram Jayanti Date 2025: वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी परशुराम जयंती साजरी केली जाते. असं मानलं जातं की परशुराम हा भगवान विष्णूचा सहावा अवतार आहे. त्यांचा जन्म प्रदोष काळात आई रेणुका आणि ऋषी जमदग्नी यांच्या पोटी झाला. त्यांना अमर मानलं जातं आणि त्यांच्या जन्माचा काळ हा सत्ययुग आणि त्रेतायुगातील संक्रमणाचा काळ मानला जातो.
असं म्हटलं जातं की भगवान विष्णूने पृथ्वीवरील दुष्ट आणि पापी राजांचा नाश करण्यासाठी परशुराम म्हणून सहावा अवतार घेतला. त्याने पृथ्वीवर अत्याचार करणाऱ्या अनीतिमान राजांचा नाश केला. असं मानलं जातं की भगवान विष्णूच्या 10 अवतारांपैकी फक्त परशुराम अवतार पृथ्वीवर राहतो. यंदा परशुराम जयंती कधी आहे आणि महत्व काय हे जाणून घेऊया.