स्त्रियांना छाती झाकण्यासाठी सुद्धा भरावा द्यावा लागायचा कर, जाणून घ्या ब्रेस्ट टॅक्स बद्दल

केरळच्या त्रावणकोरचे राजाने निम्न जातीतील महिलांच्या ब्रेस्ट झाकण्यावर टॅक्स लावला होता.
When Women Paid Tax To Cover Their Breasts
When Women Paid Tax To Cover Their Breastsesakal
Updated on

अवघ्या काही तासातच देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण 2023-24 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर करतील. दरवर्षी अर्थसंकल्पात टॅक्सची चर्चा अधिक रंगते. अर्थमंत्री टॅक्सचं लिमिट वाढवणार की सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले असते. दरम्यान, जगातील काही देशांत अशा गोष्टींवरही टॅक्स आहेत, ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल.(When Women Paid Tax To Cover Their Breasts)

1729, मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये त्रावणकोर राज्याची स्थापना झाली. मार्तंड वर्मा हा राजा होता. जेव्हा साम्राज्य निर्माण होते तेव्हा नियम आणि कायदे केले जातात. त्याच परंपरेनुसार या राजानेही अनेक वस्तुंवर टॅक्स लावले. पण असा एक टॅक्स होता जो सध्या चर्चेत आला आहे.

भारतात केरळच्या त्रावणकोरचे राजाने निम्न जातीतील महिलांच्या ब्रेस्ट झाकण्यावर टॅक्स लावला होता. या महिलांनी ब्रेस्ट झाकले तर त्यांना टॅक्स द्यावा लागत होता. एका महिलेने हा टॅक्स देण्यास विरोध करत आपले स्तनही कापून टाकले होते. त्यानंतर तिचा मृत्यू झाला आणि राजाला हा टॅक्स बंद करावा लाला ऐकून धक्का बसेल. पण हो.

विचित्र कर

दलित आणि ओबीसी महिलांवर हा कर लादण्यात आला. त्रावणकोरमध्ये दलित आणि ओबीसी जातीतील स्त्रिया केवळ कमरेपर्यंत कपडे घालू शकत होत्या. अधिकारी आणि उच्चवर्णीय लोकांसमोरून जाताना तिला तिची छाती उघडी ठेवावी लागायची.

महिलांना त्यांचे स्तन झाकायचे असतील तर त्याऐवजी त्यांना स्तन कर भरावा लागेल. यातही दोन नियम होते. ज्याचे स्तन लहान आहे, त्याला कमी कर आणि ज्याचे स्तन मोठे आहे, त्याला जास्त कर. कराचे नाव होते मूलाक्रम.

१९ व्या दशकात साली तिने या कायद्याला न जुमानता आपले स्तन झाकायला सुरुवात केली. हे समजताच गावचा कारभारी ज्याला मल्याळम मध्ये प्रवतियार म्हंटले जाई, नांगेली कडे आला व त्याने कर भरण्यासाठी सक्ती केली. ह्यावर तिने आपला निषेध नोंदवला.

जबरदस्ती करणाऱ्या अधिकाऱ्याला धडा शिकवावा म्हणून तिने आपले स्तन कापून ह्या अधिकाऱ्यावर फेकले व राज्याला शाप दिला. तिने केळीच्या पानात आपले स्तन कापून अधिकाऱ्याजवळ दिले. थोड्याच वेळात अतिरक्तस्राव होऊन तिचा मृत्यू झाला. तिच्याबरोबर तिचा पती चिरुकंदन यानेही चितेत झेप घेतली. त्याची नोंदही इतिहासात पहिला “पुरुष सती” म्हणून झालेली आहे.

ही बातमी समजताच राजाने जनतेवरचा हा कर माघारी घेतला. आपल्यासह सर्व समाजातील स्त्रियांना स्वतंत्रपणे जगता यावे म्हणून नांगेलीने ही लढाई लढली.

पुढे 1946 साली केरळमध्ये कम्युनिस्टांच्या सेनेने राजाविरुद्ध लढा देऊन केरळमध्ये आपल्या स्वतंत्र राज्याची स्थापना केली. त्यामुळे त्रावनकोरच्या राजाचा स्वतःचा वेगळा देश बनवण्याचा प्लॅन फसला आणि हे राज्य 1949 साली भारतीय संघराज्यात विलीन करण्यात आले.

म्हणूनच हा भाग अभ्यासक्रमातुन काढल्यानंतर केरळच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली होती.

२०१९ साली आलेल्या आदई या तमिळ चित्रपटात देखील ही कथा सांगितली आहे. या घटनेनंतर तुला जागेचे नावही मुलच्छीपुरम किंवा मुलाचीपुरंबु अर्थात ‘स्तनाचे स्थान’ ठेवले गेले. आज येथे राहणारे लोक मात्र ह्या जागेचे नाव मनोरमा जंक्शन असे सांगतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com