लव्ह मॅरेज असो किंवा अरेंज, जोडादाराची Abilty टेस्ट गरजेची

Couple
Couple

नात्यामध्ये प्रेम असणे गरजेचे आहे पण, त्याशिवाय कित्येक गोष्टी अशा असतात की नात्यामध्ये महत्त्वाच्या असतात. कोणतेही नाते हे पती-पत्नी, प्रियकर-प्रेयसी दोघांच्या एकमेकांवरील विश्वास, सन्मान आणि प्रेम यावर अवलंबून असते.आज घरात मुलाचे लग्न असले की सासूचे अपेक्षा वाढत जातात. पुरुषांना अशी पत्नी हवी असते जी सुख-दुखाशिवाय त्यांच्यासोबत प्रत्येक पाऊलावर साथ देईल आणि मुलांचा सांभाळ करेल. महिलांनाही जोडीदाराकडून अशा अपेक्षा ठेवणे काही चूकीचे नाही.

महिलांनाही असा जोडीदार हवा असतो जो त्यांच्यावर प्रेम करेल, योग्य सन्मान देईल, समजून घेईल आणि नेहमी साथ देईल. पण लव्ह मॅरेज असो किंवा अरेंज मॅरेज कित्येकदा सर्व महिला स्वत:ला विसरून आपल्या नवऱ्याची प्रत्येक गोष्ट मानतात आणि त्याचा एक शब्दही खाली पडू देत नाही. अशा वेळी त्या स्वत:चा स्वाभिमान बाजूला ठेवून देतात आणि आपल्या अपेक्षाभंग झाल्या तरीही नातं टिकविण्याचा प्रयत्न करतात. अशा नात्यामध्ये तुम्ही गुदमरून जाता आणि आणि नात टिकत नाही. त्यामुळे तुम्हाला चांगले नाते टिकवायचे असेल तर या गोष्टींचा विचार करा. (Whether it's Love Marriage or Orange, you need a partner's Ability Test)

Couple
२०१६ पासून देशात 60 हजार नवे स्टार्टअप; 6 लाख रोजगार-राष्ट्रपती कोविंद

पार्टनरची Abilty टेस्ट

आज काल लव्ह मॅरेजचा काळ आहे, अशातही मुलींनी फक्त पर्सनॅलिटी पाहून लाईफ पार्टनर निवडू नये. लाईफ पार्टनर निवडताना हे लक्षात ठेवा की, तुमचा जोडीदार तुम्हाला समजून घेणारा पाहिजे. त्यामुळे पार्टनरची Abilty टेस्ट गरजेची आहे. नाते जोडण्यासाठी प्रत्येक गोष्ट क्लिअर केली पाहिजे.

नवऱ्याचा प्रत्येक निर्णय शेवटचा समजू नका

कित्येकदा लव्ह मॅरेजनंतर मुली सर्व काही विसरतात आणि आपल्या जोडीदाराचा निर्णय म्हणजे सर्वकाही समजतात. अशावेळी ते स्वत:ला विसरून फक्त इतरांच्या बाबत विचार करतात. जर तुम्हाला तुमचा जोडीदार खूप जास्त अॅग्रिसिव्ह वाटत असेल तर तुम्हाला भविष्यात अशा स्वभावामुळे त्रास होऊ शकतो. त्यामुळे जोडीदार निवडताना सर्व गोष्टींचा विचार करा.

Couple
महिलांना पोस्टपार्टम डिप्रेशन कशामुळे येतं? ही लक्षणे दिसल्यास सावध राहा

योग्य वेळी स्वाभिमान दाखवणे गरजेचे आहे.

प्रत्येक व्यक्तीला नात्यामध्ये सन्मान मिळाला पाहिजे. तुम्हाला जर नात्यात योग्य सन्मान मिळत नसेर तर वेळीच तुम्ही त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. जर तुम्ही दुसऱ्यांचा विचार करुन शांत राहात असाल तर तुम्ही आपले म्हणणे मांडण्यासाठी तुम्हाला गैरसोयीचे वाटत असेल तर योग्य वेळ ठरवून आपला स्वाभिमानाबाबत विचार करा आणि आपल्या जोडीदारासमरो आपले मत मांडा.

नवऱ्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव करून द्या

कोणलाही त्याच्या जबाबदाऱ्या समजावून सांगणे अवघड असते. पण ते गरजेचे असते. जर तुमचा पती किंवा होणारा जोडीदारला आपल्या जबाबदाऱ्या समजून घेण्यासाठी खूप त्रास होत असेल तर तुम्ही योग्य वेळीची वाट बघा आणि मग जोडीदारासोबत बोला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com