अनेकांना नकोसा वाटणारा ऋतु म्हणजे उन्हाळा. फेब्रुवारी महिना संपत आला की उन्हाळ्याची चाहुल लागू लागते. या काळात वातावरणात उष्णता हळूहळू वाढत असल्यामुळे अनेक जण बेजार होतांना दिसतात. तर, काही जण या काळातही कूल म्हणजेच फॅशनेबल राहण्याचा प्रयत्न करत असतात. उन्हाळ्यात कितीही गरम होत असलं किंवा अन्य कोणतेही शारीरिक त्रास जाणवत असले तरीदेखील हा ऋतू नवनवीन फॅशन कॅरी करण्यासाठी परफेक्ट असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळेच या काळात अनेक जण नव्या फॅशनचे कपडे, सनग्लासेस किंवा छत्र्यांचे प्रकार ट्राय करताना दिसत असतात. विशेष म्हणजे तरुणाईमध्ये सध्या सनग्लासेसची विशेष क्रेझ असल्याचं दिसून येतं. त्यामुळेच बाजारात वेगवेगळ्या आकाराचे, रंगांचे सनग्लासेस उपलब्ध आहेत. परंतु, बाजारात असे असंख्य सनग्लासेस पाहिल्यानंतर नेमका कोणता घ्यावा किंवा कोणता सनग्लास आपल्याला सूट होईल याविषयी काही जणांमध्ये द्विधा मनस्थिती असते. त्यामुळेच कोणत्या चेहऱ्याच्या आकाराप्रमाणे कोणता सनग्लासेस आपल्याला सूट होईल किंवा साजेसा दिसेल ते पाहुयात.