Milk Types | चुकीच्या प्रकारचं दूध प्यायलात तर पडाल आजारी; तुमच्यासाठी कोणतं दूध योग्य ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Milk Types

Milk Types : चुकीच्या प्रकारचं दूध प्यायलात तर पडाल आजारी; तुमच्यासाठी कोणतं दूध योग्य ?

मुंबई : लहानपणापासून आपल्याला सांगितले जाते की दुधामुळे हाडे मजबूत होतात. रोज दूध प्यायल्याने दातदुखीही कमी होते. हे काही प्रमाणात खरेही आहे, पण हेही तितकेच खरे आहे की, दूध प्रत्येकासाठी चांगलेच असेलच असे नाही.

तुम्ही इतकी वर्षे दूध पित आहात आणि तुमच्या पोटाने ते पचवले असेलही पण याचा अर्थ असा नाही की ते तुमच्यासाठी नेहमीच चांगले असते. दूध प्यायल्यानेही अनेक आजार होऊ शकतात.

मिस इंडिया स्पर्धकांना प्रशिक्षण देणाऱ्या एक्सपर्ट डायटीशियन अंजली मुखर्जीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर दुधाशी संबंधित काही गोष्टी शेअर केल्या आहेत. त्यांनी दुधामुळे आजारी पडण्याची कारणे दिली आहेत. हेही वाचा - दुधदुभते मुबलक हवे....मग हे नक्कीच वाचा

हेही वाचा: Ashok Saraf आणि Urfiला झालेला लॅरिन्जायटिस आजार तुम्हाला झाल्यास काय कराल ?

दुधाची प्रथिने तुम्हाला आजारी पाडू शकतात

दुधामध्ये एक प्रोटीन असते ज्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. हे प्रोटीन म्हणजे गाईच्या दुधात असलेले A1 बीटा केसिन प्रोटीन आहे.

या प्रोटीनमुळे सर्दी, सायनसची समस्या, थकवा, शरीरात जडपणा, टाइप 2 मधुमेह, ऑटिझम आणि अगदी न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर यासारख्या अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

कोणते दूध आरोग्यदायी आहे ?

A1 बीटा-केसिन प्रोटीन नसलेले दूध आरोग्यदायी मानले जाते. अशा दुधाला A2 दूध म्हणतात. हे प्रक्रिया केलेले दूध आहे, ज्याचा आजकाल आहारतज्ञ अधिक प्रचार करत आहेत.

हे दूध पूर्णपणे आरोग्यदायी असल्याचा समजही पूर्णपणे योग्य नाही. A2 दुधावर अजून संशोधन चालू आहे आणि त्यामुळे असे होऊ शकते की हे दूध काही लोकांसाठी योग्य नसेल.

हेही वाचा: Pollution Asthma : दिवसेंदिवस वाढणारे प्रदूषण थेट फुप्फुसांवर करत आहे आक्रमण

गरजेनुसार दूध प्या

प्रत्येकाच्या गरजेनुसार वेगवेगळ्या प्रकारचे दूध पिता येते. शेंगदाण्यापासून तयार केलेले दूधही बाजारात उपलब्ध आहे आणि त्यामुळे तुम्हाला विचारपूर्वक दूध निवडावे लागेल.

जर तुमच्याकडे फॅटची कमतरता असेल तर फुल क्रीम दूध सर्वोत्तम आहे. जर तुम्हाला जास्त प्रथिने आणि कमी चरबीची गरज असेल तर स्किम्ड दूध योग्य असेल.

जर तुम्हाला दुधाची कोणतीही समस्या नसेल, परंतु पौष्टिक दूध हवे असेल तर डबल टोन्ड योग्य असेल. जर तुम्हाला दुधापासून जास्त ऊर्जा हवी असेल आणि फॅट कमी असेल तर टोन्ड मिल्क योग्य असेल.

जर तुम्हाला कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन समान प्रमाणात हवे असतील तर शेळीचे दूध प्या. जर तुम्हाला दुधाची अॅलर्जी असेल किंवा दूध पचत नसेल तर बदामाचे दूध घेऊ शकता.

जर तुम्हाला दुधाच्या प्रोटीनची समस्या असेल तर A2 दूध घेऊ शकता.

टॅग्स :Milkdiet tips