White Bread VS Brown Bread :व्हाईट आणि ब्राऊन ब्रेडमध्ये कोणता ब्रेड आरोग्यासाठी नुकसानकारक आहे ?

ब्रेडमध्ये असलेले पोटॅशिअम ब्रोमेट हे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे.
White Bread VS Brown Bread
White Bread VS Brown Breadesakal

अनेकांची सकाळ ही नाश्त्यामध्ये ब्रेड खाऊन होते. ब्रेड हा आपल्या रोजच्या आहारातील एक महत्वाचा भाग झाला आहे. ब्रेड खायला अनेकांना आवडतं, कुणी ब्राऊन ब्रेड खायला पसंती देतात तर कुणी व्हाईट अर्थात पांढरा ब्रेड खायला पसंती देतात.

व्हाईट असो किंवा ब्राऊन ब्रेड हे खायला जितके चविष्ट लागतात तितकेच ब्रेड खाल्ल्याने तोटे देखील होतात. अनेकदा भूक लागल्यावर आपण ब्रेड खातो. परंतु, ब्रेड खाल्ल्याने आपल्या शरिराला कोणतेही पोषक घटक मिळत नाहीत. ब्रेडमध्ये असलेले पोटॅशिअम ब्रोमेट हे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे.

आज आपण व्हाईट ब्रेड आणि ब्राऊन ब्रेडपैकी कोणता ब्रेड आरोग्यासाठी जास्त नुकसानकारक आहे ? त्याबद्दल जाणून घेणार आहोत.

व्हाईट ब्रेड Vs ब्राऊन ब्रेड या दोन्हींमध्ये किती कॅलरीज ?

  • व्हाईट ब्रेड आणि ब्राऊन ब्रेडमध्ये तुलना केली तर व्हाईट ब्रेडमध्ये सर्वात जास्त कॅलरीजचे प्रमाण आढळून येते. पंरतु, कॅलरीजच्या संख्येत फार काही फरक नसतो.

  • पांढऱ्या ब्रेडच्या एका स्लाईसमध्ये जवळपास ७७ कॅलरीज असतात. या उलट ब्राऊन ब्रेडच्या एका स्लाईसमध्ये ७५ कॅलरीज असतात.

  • पौष्टिकतेचा विचार केल्यास ब्राऊन ब्रेड हा व्हाईट ब्रेडला वरचढ ठरतो. कारण, व्हाईट ब्रेडपेक्षा ब्राऊन ब्रेडमध्ये अधिक पोषक घटक असतात.

  • महत्वाची बाब म्हणजे ब्राऊन ब्रेडचा ग्लायसेमिक इंडेक्स हा पांढऱ्या ब्रेडपेक्षा कमी असतो.

White Bread VS Brown Bread
Instant Bread Receipe : ब्रेड उरला आहे? मग बनवा खास शाही तुकडा घरच्या घरी फक्त २० मिनिटांत

कोणता ब्रेड जास्त नुकसानकारक ?

  • व्हाईट ब्रेडमध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे, व्हाईट ब्रेडचे नियमित सेवन केल्यास तुमचे वजन वाढण्याचा धोका सर्वात जास्त असतो.

  • व्हाईट ब्रेडमध्ये पोषक तत्वांचे आणि फायबर्सचे कमी प्रमाण आढळून येते.

  • व्हाईट ब्रेडच्या तुलनेत ब्राऊन ब्रेडमध्ये पोषकतत्वांचे प्रमाण जास्त आढळून येते.

  • ब्राऊन ब्रेडमध्ये मॅग्नेशिअम, झिंक, फॉलिक अ‍ॅसिड, झिंक, कॉपर, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन B 6  इत्यादी पोषकघटकांचे प्रमाण आढळते. त्यामुळे, ब्राऊन ब्रेडचे सेवन करण्यावर अनेक जण भर देतात.

  • मार्केटमध्ये आजकाल ब्राऊन ब्रेडचे प्रमाण वाढले आहे. लोकांकडून ब्राऊन ब्रेडची मागणी वाढल्यामुळे अर्थातच ब्रेडमध्ये भेसळ होण्याचे प्रमाण ही वाढले आहे. त्यामुळे, ब्राऊन ब्रेड खरेदी करताना योग्य काळजी घ्या.

  • ब्रेडमध्ये सोडिअमचे प्रमाणा सर्वाधिक असते, त्यामुळे, ब्लड प्रेशर आणि हृदयविकाराच्या समस्या निर्माण होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे, ब्रेड कोणताही असो, व्हाईट असुदे किंवा ब्राऊन असो. तुम्ही ब्रेडचे सेवन हे प्रमाणातच करायला हवे.

White Bread VS Brown Bread
Brown Bread Benefits: तुम्ही ब्राऊन बेड खाताय मग ही बातमी तुमच्याचसाठी...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com