

Why After Marriage first Night Called As Suhag Raat : हिंदी सिनेमात आपण बऱ्याचदा बघितलेलं असतं की, लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीला फार महत्व असतं. हिरो हिरोइन त्याचे अनेक स्वप्न रंगवताना दिसतात. त्यावर अनेक गाणीही प्रसिध्द आहेत. खऱ्या आयुष्यातही नवविवाहितांसाठी ही रात्र विशेषच असते यात शंका नाही. पण त्याला सुहाग रात का म्हणतात हा प्रश्न पडतोच.
हल्ली लग्ना आधी मुलगा मुलगी एकमेकांना ओळखत असण्याचं प्रमाण बरच मोठं आहे. तरीही आयुष्य भरासाठी एकमेकांच्या बंधनात अडकल्यावर ही पहिली रात्र असते जेव्हा ते एकमेकांना नव्याने पुन्हा ओळखायला सुरूवात करतात. अरेंज्ड मॅरेजमध्ये म्हणूनच ही रात्र महत्वाची असते.
या चुका अजिबात करू नका
बऱ्याचदा एकमेकांना ओळखून घेताना एकमेकांच्या भूतकाळाविषयी विचारलं जातं. पण ही सर्वात मोठी चुक आहे. या रात्री भूतकाळावर चर्चा करू नये.
कौटुंबिक विषयावर, कुटुंबातील सदस्यांविषयी बोलू नका.
अशा ज्या गोष्टीने मूड जाईल, वाद होईल अशा कोणत्याही विषयावर चर्चा न करता फक्त एकमेकांविषयी बोला.
शारीरिक संबंध ठेवण्याची घाई करू नका.
कोणाची निंदा करू नका.
का म्हणतात सुहाग रात?
लग्नानंतर त्या स्त्रीला सौभाग्यवती म्हणतात. तिच्या (सुहागन) या नव्या प्रवासाची ही सुरूवात असल्याने या पहिल्या रात्रीला सुहाग रात म्हणतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.