Pilots Different Food: ...म्हणून फ्लाईटच्या पायलट आणि को-पायलट वेगवेगळे जेवण दिले जाते | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

...म्हणून फ्लाईटच्या पायलट आणि को-पायलट वेगवेगळे जेवण दिले जाते

...म्हणून फ्लाईटच्या पायलट आणि को-पायलट वेगवेगळे जेवण दिले जाते

विमानाचे उड्डान करण्यासाठी दोन पायलट्स (Pilots in Aeroplane) असतात. ही गोष्ट तर तुम्हाला माहित असेलच की प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विमानामध्ये दोन पायलट असतात. पण, तुम्हाला हे माहित नसेल की विमानामध्ये दोन पायलेटसला नेहमी वेगवेगळे जेवण का दिले जाते? त्यांना एक सारखे जेवण दिले जात नाही, या मागील कारण खूप इंटरेस्टिंग आहे. (Why are pilots and co-pilots served different food in airplane)

हेही वाचा: महागाईचा फटका! अमूलनंतर मदर डेअरीने वाढवले दुधाचे भाव

दोन्ही पायलट्स वेगवेगळे जेवण का दिले जाते.

सन १९८४मध्ये एक कॉनकॉर्ड सुपरसॉनिक फ्लाईट लंडनवरून न्यूयॉर्कला जात होती, या फ्लाईटमध्ये एक आश्चर्यकारक घटना घडली होती. या फ्लाईटमध्ये एकूण १२० प्रवासी होते. सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्सला एक सारखे जेवण दिले होते. त्या जेवणामध्ये काहीतरी कमी होते ज्यामुळे सर्वांना अन्नबाधा( food Poisoning) झाली होती. यानंतर सर्वांना उल्टी, ताप आणि जुलाबचा त्रास झाला. फूड पाईजिनिंगमुळे एका प्रवाशाचा मृत्यू देखील झाला.

या फ्लाईटच्या दोन्ही पायलटला देखील खूप समस्यांचा सामना करावा लागला. अशा घटनांपासून वाचण्यासाठी आता खूप सावधगिरी बाळगली जाते. त्यामुळे एका फ्लाईटच्या पायल आणि को-पायलटला कधीच एक सारखे जेवण दिले जात नाही आणि दोघांना वेग-वेगळे जेवयाला दिले जाते. कारण जर कधी फूड पॉईजनिंगची समस्या झाल्यास दोघांपैकी कमीत कमी एक पायलट सुरक्षित राहिल आणि प्रवाशांच्या सुरक्षित पोहचू शकत नाही.

हेही वाचा: International Women’s Day: महिलांकडे 'या' ५ विमा पॉलिसी असल्याच पाहिजे

फूड पॉईजनिंगपासून वाचण्यासाठी 'असे' केले जाते

साधरणत: पायलटला फर्स्ट क्लासचे जेवण आणि को-पायलेटला बिझनेस क्लासचे जेवण दिले जाते. काही एअरलाईन्सला कॉकपिटचे क्रू मेंबर्ससाठी वेगवेगळे जेवण बनवते. या एअरलाईन्स पायलट आणि को-पायलटला वेगळे जेवण देताता, जे प्रवाशांच्या जेवणापेक्षा वेगळे असते. हे अन्न खूप साधे असते. एकूण २०१२ मध्ये सीएनएनने एका कोरियन पायलटचा इंटरव्हू घेतला होता. ज्यामध्ये त्याने सांगितले होते की फूड पॉईझनिंगपासून वाचण्यासाठी दोन्ही पायलटला वेगवेगळे जेवण दिले जाते.

Web Title: Why Are Pilots And Co Pilots Served Different Food In Airplane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top