अंतर सांगणाऱ्या मैलाच्या दगडांचे रंग वेगळे का असतात? जाणून घ्या रंगांचा अर्थ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Milestone

तुम्ही रस्त्याच्या कडेला असलेले माइलस्टोन पाहिले असतील.

अंतर सांगणाऱ्या मैलाच्या दगडांचे रंग वेगळे का असतात?

आपल्या दैनंदिन गोष्टींमध्ये अशा अनेक गोष्टी असतात. ज्या आपण अनेकदा पाहतो, परंतु त्याबद्दल आपल्याला सर्व काही माहित नसते. असे प्रकार आपण रस्त्यावरून चालताना अनेकदा पाहतो. तो म्हणजे माईलस्टोन (Milestone). तुम्ही रस्त्याच्या कडेला असलेले माइलस्टोन पाहिले असतील. हे माइलस्टोन काही पिवळ्या रंगाचे असतात, काही हिरवे असतात, तर काही माइलस्टोन काळ्या किंवा केशरी रंगाचे असतात. माइलस्टोनच्या विविध रंगांचा (Milestone colour meaning) अर्थ काय ते जाणून घ्या.

हेही वाचा: Nude रंग फॅशनमध्ये घेत आहे हॉट स्पॉट ! आता तुमचेही वॉर्डरोब करा अपडेट

रस्त्याने चालणाऱ्या लोकांना शहरे आणि येणारी ठिकाणे किती अंतर आहे हे सांगण्यासाठी माइलस्टोन ठेवले जाते हे तुम्हाला माहीत असेलच. विकासाबरोबर जागोजागी मोठमोठे फलक लावले जातात जे तेच काम करतात, पण आजही तुम्हाला रस्त्यांवर मैलाचे दगड दिसतील. त्यांच्या रंगांचा खूप महत्त्वाचा अर्थ आहे जे फार कमी लोकांना माहीत आहे.

पिवळा रंगाचा दगड (Yellow colour milestone):

जर तुम्ही एखाद्या रस्त्यावर चालत असाल आणि तुम्हाला पिवळ्या रंगाचा मैलाचा दगड दिसला तर समजा तो रस्ता राष्ट्रीय महामार्ग (National highway) आहे. राष्ट्रीय महामार्गावरील मैलाच्या दगडाचा रंग पिवळा असतो. राष्ट्रीय महामार्ग हे असे रस्ते आहेत ज्यांचे बांधकाम आणि सुधारणा भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे आहे. देशात NH 24, NH 8 असे अनेक राष्ट्रीय महामार्ग आहेत. उत्तर-दक्षिण-पूर्व-पश्चिम कॉरिडॉर आणि गोल्डन क्वाड्रीलैट्रल असे फक्त राष्ट्रीय महामार्ग (National highway) आहेत.

हेही वाचा: रंग-रेषांची उलगडली अनोखी दुनिया

हिरव्या रंगाचा दगड (Green colour milestone) :

जर तुम्हाला माईलस्टोनवर हिरव्या रंगाचा मैलाचा दगड दिसला तर समजा की तो रस्ता हा राज्य महामार्गाच्या (State highway) मैलाचा दगड आहे. म्हणजेच तो रस्ता बांधण्याची आणि देखभाल करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. सामान्यतः राज्यांत प्रवेश केल्यानंतर वेगवेगळ्या शहरांमध्ये जाण्यासाठी या महामार्गांचा वापर केला जातो.

काळा, निळा किंवा पांढरा रंगाचा दगड (Black, Blue and White Milestone) :

जर तुम्हाला रस्त्याच्या कडेला काळे, निळे आणि पांढरे मैलाचे दगड दिसले, तर याचा अर्थ तुम्ही एखाद्या मोठ्या शहरात किंवा जिल्ह्यात प्रवेश (District roads) केला आहे. या रस्त्यांच्या बांधकाम आणि देखभालीची जबाबदारी शहरातील महापालिकेची आहे.

केशरी रंगाचा दगड (Orange colour milestone) :

जर तुम्हाला केशरी रंगांचे माइलस्टोन दिसले तर याचा अर्थ तुम्ही एखाद्या गावात प्रवेश (Village roads) केला आहे. केशरी पट्ट्याही प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेशी संबंधित आहेत.

टॅग्स :National Highway