चीनच्या महिला का खरेदी करतायेत पुरुषांचे कपडे ? 'या' ४ कारणांमुळे बदलतोय फॅशन ट्रेंड !

एका लाईव्ह स्ट्रीममुळे बदलली तरुणींची आवड; महिलांच्या कपाटात होतोय पुरुषांच्याच कपड्यांचा भरणा.
Girls in China are buying men's clothes!

Girls in China are buying men's clothes!

Updated on

चीनमधील तरुण महिलांमध्ये सध्या एक अतिशय वेगळा आणि रंजक फॅशन ट्रेंड वेगाने लोकप्रिय होत आहे. इथल्या बाजारपेठांमध्ये तरुणी मोठ्या संख्येने महिलांच्या सेक्शनऐवजी थेट पुरुषांच्या (Menswear) सेक्शनमधून कपडे खरेदी करत आहेत. त्यांच्या कपाटात आता शर्ट, टी-शर्ट आणि शॉर्ट्सची संख्या वाढतेय, पण विशेष म्हणजे हे कपडे त्यांनी त्यांच्या भाऊ, वडील किंवा बॉयफ्रेंडसाठी नाही, तर स्वतःसाठी खरेदी केले आहेत.

एका शर्टमुळे बदलले पूर्ण कपाट

या ट्रेंडचा भाग असलेल्या एका महिलेने सांगितले की, २०२३ मध्ये सोशल मीडियावर पुरुषांचे शर्ट विकणारा एक लाईव्ह स्ट्रीम पाहिल्यानंतर तिने पहिल्यांदा स्वतःसाठी पुरुषांचा शर्ट खरेदी केला. सुरुवातीला तिला वाटले की हा फक्त एक प्रयोग असेल, पण जेव्हा तिने तो शर्ट घातला, तेव्हा तो महिलांच्या नेहमीच्या कपड्यांपेक्षा कितीतरी पटीने अधिक आरामदायी (Comfortable) होता. यानंतर तिने पुरुषांचे इतर कपडेही खरेदी करण्यास सुरुवात केली आणि पाहता पाहता तिचे संपूर्ण कपाट पुरुषांच्या कपड्यांनी भरून गेले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com