Christmas Facts: ख्रिसमस डिसेंबरमध्येच का साजरा केला जातो? कारण आहे खूप खास

नाताळ सण का साजरा केला जातो? जाणून घ्या
Christmas Facts: ख्रिसमस  डिसेंबरमध्येच का साजरा केला जातो? कारण आहे खूप खास

भारतातही ख्रिसमसचा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. आम्ही तुम्हाला सांगतो की परदेशापासून भारतात हा सण वेगवेगळ्या शैलीत साजरा केला जातो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की नाताळचा सण डिसेंबरमध्येच का साजरा केला जातो? चला जाणून घेऊया या मागचे मनोरंजक कारण.

ख्रिसमस का साजरा केला जातो?

ख्रिसमस साजरा करण्याची अनेक कारणे आहेत. असे म्हटले जाते की प्रभू येशूचा जन्मदिवस जन्म 25 डिसेंबर रोजी झाला होता. येशू ख्रिस्ताचे मुलांवर खूप प्रेम होते. यामुळेच नाताळच्या दिवशी मुलांसाठी खास भेटवस्तू खरेदी केल्या जातात.

नाताळ डिसेंबरमध्येच का साजरा केला जातो?

ख्रिसमसच्या उत्सवाशी संबंधित एक कथा सांगितली जाते. असे मानले जाते की प्रभू येशूची आई मेरीने आधीच भाकीत केले होते की ती 9 महिन्यांनंतर 25 डिसेंबर रोजी आई होईल. नऊ महिन्यांनंतर नेमके तेच घडले. यामुळेच दरवर्षी 25 डिसेंबरला ख्रिसमस साजरा केला जातो.

ख्रिसमस ट्री खूप खास आहे

ख्रिसमस ट्रीला सनोबर आणि फर ट्री देखील म्हणतात. या झाडाचा आकार त्रिकोणी आहे. ख्रिसमसच्या सणामध्ये हे झाड घरात केवळ सजावटीसाठी लावले जात नाही. या दिवशी ख्रिसमस ट्री लावणे खूप शुभ मानले जाते.

सांता क्लॉज

सांता निकोलस यांना सांता क्लॉजच्या नावाने ओळखलं जाते. त्यांचा जन्म प्रभू येशूनंतर जवळपास २८० वर्षांना झाला होता. सांता निकोलस यांनी आपलं पूर्ण जीवन प्रभू येशूंना समर्पित केलं होतं. दरवर्षी ते येशूच्या जन्मदिनाचं औचित्य साधत अंधारात मुलांना भेटवस्तू द्यायचे. तेव्हापासून आतापर्यंत ही प्रथा आहे. आजही लोकं सांता क्लॉज बनून मुलांना भेटवस्तू देतात.

ख्रिसमस कसा साजरा करायचा

ख्रिसमसला खूप खर्च करून घर सजवलं पाहिजे असं नाही. घरातील वस्तू देखील तुम्ही सजावटीसाठी वापरू शकता. यासोबतच तुम्ही तुमच्या घराच्या आजूबाजूला असलेल्या मॉल्सला जाण्याचा प्लॅनही बनवू शकता, जे ख्रिसमसच्या वेळी खास पद्धतीने सजवले जातात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com